April 18, 2026
आरोग्य जिल्हा बुलडाणा

जिल्ह्यात आज प्राप्त 295 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर 59 पॉझिटिव्ह

19 रूग्णांना मिळाली सुट्टी


बुलडाणा : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 354 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 295 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 59 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 31 व रॅपिड टेस्टमधील 28 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 95 तर रॅपिड टेस्टमधील 200 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 295 अहवाल निगेटीव्ह आहेत.
पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : मोहोज (भडगांव) ता. बुलडाणा : 1, बुलडाणा शहर : लहाने ले आऊट 4, आरास ले आऊट 1, लांडे ले आऊट 2, चैतन्यवाडी 1, वावरे ले आऊट 1, शिवाजी नगर 3, मेहकर : 3, डोणगांव रोड 2, जानेफळ ता. मेहकर : 5, चिखली : 1, मलकापूर : 1, हतेडी ता. बुलडाणा : 2, दे. राजा : 1, जुना जालना रोड 1, बालाजी नगर 3, खामगांव : वाडी 1, मखारीया मैदान 4, घाटपुरी नाका 2, जलालपूरा 2, शिवाजी वेस 3, भालेगांव बाजार ता. खामगांव : 2, शेगांव : मोदी नगर 1, ओम नगर 1, देशमुखपुरा 1, लोणार : 1, पिं.काळे ता. जळगांव जामोद : 8 संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 59 रूग्ण आढळले आहे.


तसेच आज 19 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.
सुट्टी देण्यात आलेले रूग्ण पुढीलप्रमाणे : माटरगांव ता. शेगांव : 8, बावनबीर ता. संग्रामपूर : 3, मलकापूर : 2, आनंद सोसायटी 1, रोहणा ता. खामगांव : 1, खामगांव : शिवाजी वेस 1, सती फैल 1, तलाव रोड 2.
तसेच आजपर्यंत 13520 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 1253 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 1253 आहे.
आज रोजी 179 नमुने अहवालाच्या प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 13520 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 2126 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 1253 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात 835 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 38 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

Related posts

बलात्कार करून फरार आरोपी 37 वर्षानंतर पकडला

nirbhid swarajya

माझ भाग्य़ आहे की शेतकऱ्यांसाठी आंदोलन करुन माझा वाढदिवस साजरा करीत आहे – ॲड.आकाश फुंडकर

nirbhid swarajya

कोरोना मुळे केला नोंदणी विवाह

nirbhid swarajya
error: Content is protected !!