September 5, 2026
आरोग्य खामगाव जिल्हा बुलडाणा महाराष्ट्र राजकीय लोणार विदर्भ

आज शांतता समिती बैठकीचे आयोजन

खामगांव : आगामी येणाऱ्या गणेशोत्सव, मोहरम व इतर सण उत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर धार्मिक / जातीय सलोखा वृद्धिंगत करण्यासाठी आज दिनांक 14 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6: 30 वाजता आईसाहेब मंगल कार्यालय येथे शांतता समितीची बैठकीचे आयोजन केले आहे. सदर बैठकीमध्ये जिल्हा पोलीस अधीक्षक दिलीप पाटील भुजबळ अॅड.आ आकाश फुंडकर, अप्पर पोलीस अधीक्षक हेमराज सिंह राजपूत, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील तसेच शिवाजी नगर पो.स्टे.ठाणेदार सुनील हुड, ग्रामीण पो.स्टे.ठाणेदार रफिख शेख यांच्या उपस्थितीत होणार आहे.या बैठकीला सर्व मंडळाचे पदाधिकारी तसेच प्रतिष्ठित नागरिक ,पत्रकार ,शांतता समितीचे सदस्य यांनी उपस्थित राहावे असे आवाहन शहर पोलिस स्टेशनचे ठाणेदार सुनील अंबुलकर यांनी केले आहे.

Related posts

वरुड येथील युवक शेतकऱ्याचा विषबाधा होऊन मृत्यू

nirbhid swarajya

पशुवैद्यकीय दवाखाना बनला दारुड्यांचा अड्डा

nirbhid swarajya

“मध्यप्रदेशसारखे महाराष्ट्रात ही ऑपरेशन लोटस झाल तर…धनजंय मुंडेंनी दिले उत्तर

nirbhid swarajya
error: Content is protected !!