September 5, 2026
गुन्हेगारी बुलडाणा महाराष्ट्र राजकीय

शेगाव नगरपालिकेवर दगडफेक ; कर्मचाऱ्यांनी थांबवले कामकाज

शेगाव: येथील नगर परिषद प्रवेशद्वारावर आज सकाळी ११ वाजताच्या सुमारास अज्ञात इसमांनी तोडफोड करुन दगडफेक केली. सकाळी अचानक इमारतीच्या आत प्रवेश करून शिवीगाळ करुन दगडफेक केल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. याप्रकरणी कर्मचाऱ्यांनी दुपारी काम बंद आंदोलन सुरु केले आहे.यावेळी नगर परिषद कर्मचारी यांनी शहर पोलिसात निवेदनात दिलेल्या नमूद आहे की, झालेल्या या घटनेमुळे कर्मचाऱ्यांमधे भीतिचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी तात्काळ या हल्लेखोराना अटक करुन कारवाईची मागणी केली आहे.

Related posts

जिल्ह्यात आज प्राप्त 251 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर 34 पॉझिटिव्ह

nirbhid swarajya

बस स्टॅन्ड वर छेडछाड काढणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल…

nirbhid swarajya

विष प्राशन केलेल्या एस टी कर्मचाऱ्याचा अखेर मृत्यू..

nirbhid swarajya
error: Content is protected !!