April 19, 2026
आरोग्य जिल्हा बुलडाणा

जिल्ह्यात आज प्राप्त 89 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर 13 पॉझिटिव्ह

रूग्णांची कोरोनावर मात, एका दिवसात सुट्टी झालेले आतापर्यंतचे सर्वात जास्त रूग्ण


बुलडाणा : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 104 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 89 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 13 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 10 व रॅपिड टेस्टमधील 3 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 46 तर रॅपिड टेस्टमधील 43 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 89 अहवाल निगेटीव्ह आहेत.
पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : खामगांव : 60 वर्षीय पुरूष, नांदुरा रोड 53 व 24 वर्षीय पुरूष, देशमुख फैल 65 वर्षीय महिला, पि. राजा ता. खामगांव : 36, 38, 23, 55 वर्षीय पुरूष,11 वर्षीय मुलगी, अमृत नगर 54 वर्षीय पुरूष, अंजनी ता. मेहकर : 60 वर्षीय महिला, चिखली : गांधी नगर 71 वर्षीय पुरूष, बुलडाणा अर्बन जवळ 57 वर्षीय पुरूष संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 13 रूग्ण आढळले आहे.
तसेच आज 46 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. आजपर्यंत एका दिवसात सर्वात जास्त रूग्णांना सुट्टी आज देण्यात आली आहे. सुट्टी देण्यात आलेले रूग्ण पुढीलप्रमाणे : नांदुरा : 38, 18, 30 व 9 वर्षीय पुरूष, 13 व 34 वर्षीय महिला, मेहकर : बालाजी मंदीराजवळ 24 व 30 वर्षीय पुरूष, वडगांव माळी ता. मेहकर : 46, 35 व 80 वर्षीय महिला, 51 व 40 वर्षीय पुरूष, चिखली :29 व 21 वर्षीय पुरूष, 49 वर्षीय महिला व महिला, मलकापूर :12 वर्षीय पुरूष, रोहीदास नगर 25, 30 व 12 वर्षीय महिला, खामगांव : 60, 31, 56 व 51 वर्षीय महिला, 45 वर्षीय पुरूष, सीपीडी रोड 30 वर्षीय पुरूष, बस स्थानकाजवळ 55 वर्षीय महिला, जलंब नाका 25 वर्षीय पुरूष, पोस्ट ऑफीसजवळ 44 वर्षीय पुरूष, बाळापूर फैल 25 वर्षीय दोन पुरूष, शंकर नगर 32, 28 व 52 वर्षीय पुरूष, 60 वर्षीय दोन महिला, 19, 20, 46 व 54 वर्षीय महिला, सुटाळा 20 वर्षीय तरूणी, शिवाजी नगर 38 वर्षीय महिला, वाडी 26 व 47 वर्षीय महिला, दाल फैल 40 वर्षीय महिला रूग्ण. तसेच आजपर्यंत 6122 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 398 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 398 आहे.
आज रोजी 251 नमुने अहवालाच्या प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 6122 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 755 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 398 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात 335 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 22 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

Related posts

श्रमदानातून उमरा गावातील लोकांनी तयार केला वनराई बंधारा…

nirbhid swarajya

लॉयन्स क्लब ऑफ खामगांव सिल्व्हरसिटी वतीने भव्य लावणी नृत्य स्पर्धेचे आयोजन

nirbhid swarajya

शेतीतील आंतर मशागतीच्या कामांना वेग

nirbhid swarajya
error: Content is protected !!