September 5, 2026
आरोग्य जिल्हा

जिल्ह्यात आज प्राप्त 3 कोरोना अहवाल ‘पॉझीटीव्ह’; तर 1 निगेटीव्ह

बुलडाणा : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या अहवालांपैकी 4 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 1 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 3 अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवाल हे जळगांव जामोद येथील 56 वर्षीय पुरूष, बहापूरा ता. मलकापूर येथील 24 वर्षीय महिला व डोणगांव, ता. मेहकर येथील 20 वर्षीय महिला रूग्णाचे आहेत.  डोणगांव येथील महिला रिसोड जि. वाशिम येथून आली असून सदर महिलेचा स्वॅब रिसोड येथे पॉझीटीव्ह आला आहे.  आतापर्यंत 81 कोरोनाबधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 81 आहे.  सध्या रूग्णालयात 47 कोरोनाबाधीत रूग्णांवर उपचार  सुरू आहेत, अशी माहिती आरोग्य यंत्रणेकडून प्राप्‍ आहे.  तसेच आतापर्यंत 1873 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. जिल्ह्यात एकूण 133 कोरोनाबाधित रूग्ण आहेत. त्यापैकी पाच मृत आहे.   तसेच आज 16 जुन रोजी 4 अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये 3 पॉझीटीव्ह, तर 1 निगेटीव्ह आहेत. आज रोजी अहवालाच्या प्रतिक्षेत असलेले नमुने  25 आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 1873 आहेत, अशी माहिती निवासी उप जिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

Related posts

खामगाव मध्ये जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा…

nirbhid swarajya

चाँद दिसला; ‘रमजान’चे उपवास सुरू

nirbhid swarajya

बोरी अडगांव येथे उद्या श्री अखंड शिवलिंग महाअभिषेक सोहळ्याची सांगता…

nirbhid swarajya
error: Content is protected !!