September 4, 2026
बुलडाणा

मेहकर तालुक्यामधील जानेफळ मध्ये भीषण आग , आगीत पाच दुकाने भस्मसात, लाखोंचे नुकसान झाल्याचा अंदाज , आग विझवण्यात यश , मात्र आगीचे अकारण अद्यापही अस्पष्ट .. 

बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यामधील जानेफळ येथे अनेक दुकानांना सकाळी चार ते साडेचार वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागल्याने पाच दुकाने आगीत भस्मसात झालीय .. या आगीत दुकानमालकांचे लाखोंचे नुकसान झालेय असून अग्निशमन दलाच्या गाडीसह पोलिस घटनास्थळी दाखल होऊन आग विजवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले गेलेय .. सध्या आग विझवण्यात यश आले असून आग कशाने लागली याचे कारण अद्यापही अस्पष्ट आहे .. तर आगीमध्ये व्यापाऱ्यांचे लाखोंचे नुकसान झाल्याने नागरिकही मोठ्या संख्येने घटनास्थळी दाखल झाले होते ..ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याची शक्यता वर्तविण्यात स्थानिक नागरिकांकडून येत असून यावेळी आगीमध्ये दोन सिलेंडरचा स्फोट झाल्याने मोठा आवाज झाल्याची माहिती हि नागरिकांनी दिलॆय .. सध्या आग विझवण्यात यश आले असून पंचनामा सुरूय .. 

Related posts

शाहू फुले आंबेडकर फाउंडेशन च्या वतीने १२एकल महिला विधवांना शेळ्यांचे मोफत वितरण

nirbhid swarajya

बँक कर्मचाऱ्यांनी दिले एक दिवसाचे वेतन

nirbhid swarajya

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या विशिष्ट समाजाच्या युवकास पकडले

nirbhid swarajya
error: Content is protected !!