September 4, 2026
बुलडाणा

बुलडाणा जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणूक अविरोध

बुलडाणा:-जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी महाविकास आघाडीतर्फे काँग्रेसच्या सौ. मनिषा नितीन पवार तर उपाध्यक्षपदासाठी शिवसेनेच्या सौ. कमलताई जालिंदर बुधवत यांचे अर्ज दाखल झाले होते, तर भाजपतर्फे अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी सौ. रुपाली अशोक काळपांडे व सौ. जयश्री विनोद टिकार असे दोन-दोन अर्ज दाखल केले होते.
मात्र भाजपाच्या दोन्ही उमेदवारांनी त्यांचे अर्ज शेवटच्या क्षणी मागे घेतल्यामुळे बुलडाणा जिल्हा परिषद अध्यक्षपदी काँग्रेसच्या सौ. मनीषा नितीन पवार तर उपाध्यक्षपदी शिवसेनेच्या सौ. कमलताई जालिंदर बुधवत यांची निवड अविरोध विजयी म्हणून जाहीर घोषित करण्यात आली आहे.

Related posts

प्रेमात जीव देण्याची धमकी देत व्हाट्सॲपवर अश्लील व्हिडीओ व्हायरल करून विध्यार्थीनीची बदनामी : तरुणाविरुद्ध गुन्हा

nirbhid swarajya

आग लागल्याने हॉटेल जळाले; सुदैवाने जीवितहानी नाही

nirbhid swarajya

तलाव तिथे कमळ’ फुलविण्यासाठी शिक्षकाची धडपड

nirbhid swarajya
error: Content is protected !!