September 4, 2026
खामगाव गुन्हेगारी जिल्हा बुलडाणा शेगांव

भरधाव स्कॉर्पिआच्या धडकेत बापलेकासह एकाचा मृत्यू

शेगाव : भरधाव स्कॉर्पिआच्या धडकेत रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या बापलेकासह एकाचा मृत्यू झाल्याची घटना 28 ऑक्टोबररोजी रात्री 10.15 वाजता शेगाव – खामगाव रोडवरील माऊली कॉलेज जवळ घडली आहे.माऊली कॉलेजजवळ एम.एच .२८ – एएन -७२६५ ही दुचाकी उभी करून स्वप्नील उर्फ लखन मरिभान बावणे वय ३०,त्याचे वडील मरिभान हिरामन बावणे वय ५०,आणि शेख रज्जाक शेख रहेमान वय ४० सर्व रा.सरकारी फैल शेगाव हे तिघे रस्त्याच्या कडेला उभे होते.

यावेळी भरगाव वेगाने शेगावहून खामगावकडे जाणाऱ्या एम.एच.१५ बीएन-३३४९ या स्कॉर्पिआने त्यांना जोरदार धडक दिली.ही धडक इतकी जोरदार होती कि,यामध्ये स्वप्निल बावणे व मरिभान बावणे हे दोघे बापलेक जागिच ठार झाले.तर शेख रज्जाक शेख रहेमान हे गंभीर जखमी झाले आहे. त्यांना तात्काळ अकोला येथे उपचारासाठी घेवून जात असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला.शेगाव पोलिसांनी याप्रकरणी स्कॉर्पिओ चालका विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे . पुढील तपास शेगांव पोलिस स्टेशनचे ठाणेदार संतोष टाले यांच्या मार्गदर्शनात सुरु आहे .

Related posts

आ.आकाश फुंडकर यांच्या हस्ते घाटपुरी येथे पांडुरंग वाचनालयाचे उद्घाटन

nirbhid swarajya

अंधश्रध्दा रूढी, परंपरांना मूठमाती देत समाजापुढे निर्माण केला नवा आदर्श

nirbhid swarajya

जिल्हयात आज प्राप्त ६ कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’

nirbhid swarajya
error: Content is protected !!