September 5, 2026
आरोग्य जिल्हा

आज प्राप्त 33 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर 06 पॉझिटिव्ह

चार रुग्णांची कोरोनावर मात

बुलडाणा : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या अहवालांपैकी 39 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 33 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 06 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. पॉझिटिव आलेल्या अहवालांमध्ये 1 महिला व 5 पुरूष आहेत. सदर अहवाल मलकापूर येथील 25 वर्षीय तरूण, साखरखेर्डा ता. सिंदखेड राजा येथील 62 वर्षीय महिला, 44 व 26 वर्षीय पुरूष, 18 वर्षीय तरूण आणि खामगांव येथील 36 वर्षीय पुरूषाचा आहे. त्याचप्रमाणे आज चार रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. यामध्ये खामगांव व बुलडाणा येथील कोविड केअर सेंटरमधून प्रत्येकी दोन रूग्णांचा समावेश आहे. खामगांव येथील सुट्टी झालेले रूग्ण चांदुर बिस्वा ता. नांदुरा येथील 12 व 16 वर्षीय मुली आहेत. तसेच बुलडाणा येथून सुट्टी झालेल्यांमध्ये चिखली येथील महिला व निमखेड ता. दे.राजा येथील पुरूष आहे.

आतापर्यंत 1318 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. जिल्ह्यात एकूण 75 कोरोनाबाधित रूग्ण आहेत. त्यापैकी तीन मृत आहे. आतापर्यंत 47 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 47 आहे.  सध्या रूग्णालयात 25 कोरोनाबाधीत रूग्णांवर उपचार  सुरू आहेत. तसेच आज 3 जुन रोजी 39 अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये 6 पॉझीटीव्ह, तर 33 निगेटीव्ह आहेत.  आज रोजी अहवालाच्या प्रतिक्षेत असलेले नमुने 81 आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 1318 आहेत, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. आर. जी पुरी यांनी दिली आहे.

(सौजन्य :जिमाका)

Related posts

संतांची मांदियाळी : विनायक महाराज शांती आश्रम ला आले यात्रेचे स्वरुप

nirbhid swarajya

भंडारी येथील मुलगी विक्री प्रकरणाला वेगळे वळण

nirbhid swarajya

खामगावात पुन्हा कोरोनाचा शिरकाव

nirbhid swarajya
error: Content is protected !!