September 4, 2026
आरोग्य जिल्हा बातम्या बुलडाणा महाराष्ट्र मुंबई शेगांव

जागतिक क्षयरोग दिन साजरा

शेगांव : येथील सईबाई मोटे उप जिल्हा रुग्णालय शेगाव येथे आज जागतिक क्षयरोग दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून वैद्यकीय अधिक्षक डॉ. प्रेमचंद पंडीत, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रवीण घोंगटे , डॉ.चव्हाण, डॉ.प्राची जाधव यांची प्रामुख्याने उपस्थित होती. यावेळी डॉ.पंडीत व डॉ. घोंगटे यानी उपस्थितांना मार्गदर्शन केले. जास्तीत जास्त क्षयरूग्ण यांचा शोध घेऊन त्यांना ऊपचार द्यावा असे डॉक्टरांना आव्हान केले.तसेच तालुका क्षयरोग पर्यवेक्षक अभिजीत सरदार यांनी उपचारावर असलेल्या रुग्णांनांची माहीती व रूग्णांना मिळणाऱ्या सवलती बाबत माहीती दिली.व सध्या सुरू असलेल्या क्षयरोग शोध मोहीमेचा लाभ घेण्या बाबत आव्हान केले.सदर कार्यक्रम यशस्वी करण्यात व्यवहारे, नितीन घरडे, झुंगारे , मानकर ,सनानसे. कस्तुरे, माचकर, चंदनशिव व तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय शेगाव यांचे सहकार्य लाभले. सदर कार्यक्रम हा जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.मिलिंद जाधव व जागतिक आरोग्य सल्लागार डॉ. विरेंद्र वानखडे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला.

Related posts

केंद्र सरकारकडून ध्वज संहितेमध्ये बदल; आता ‘या’ वेळातही तिरंगा फडकवता येणार

nirbhid swarajya

जिल्ह्यात गारपिटीमुळे गहू व अन्य पिकाचे नुकसान

nirbhid swarajya

अवैध दारू विरुद्ध पोलिसांनी मोठी कारवाई; एका आरोपीस अटक

nirbhid swarajya
error: Content is protected !!