September 5, 2026
आरोग्य जिल्हा

आज प्राप्त 19 कोरोना अहवाल निगेटिव्ह

बुलडाणा :  प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या अहवालांपैकी 19 अहवाल आज प्राप्त झाले आहेत. हे सर्व 19 अहवाल निगेटीव्ह आहेत.  आतापर्यंत 1072 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. जिल्ह्यात एकूण 53 कोरोनाबाधित रूग्ण आहेत. त्यापैकी तीन मृत आहे.  आतापर्यंत 29 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 29 आहे.  सध्या रूग्णालयात 21 कोरोनाबाधीत रूग्णांवर उपचार  सुरू आहेत.   तसेच आज 29 मे रोजी 19 अहवाल प्राप्त झाले आहेत.सर्व अहवाल निगेटीव्ह आहेत. तसेच आज रोजी अहवालाच्या प्रतिक्षेत असलेले नमुने 103 आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 1072 आहेत, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. आर. जी पुरी यांनी दिली आहे.

सौजन्य – जिमाका

Related posts

अज्ञात वाहनांच्या धडकेत युवक ठार

nirbhid swarajya

nirbhid swarajya

अशोक सोनोने यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग व्यक्तीला सायकल भेट

nirbhid swarajya
error: Content is protected !!