September 4, 2026
खामगाव जिल्हा बातम्या बुलडाणा शेतकरी

शेतकऱ्यांचे कांदा भाववाढी साठी उपविभागीय अधिकारी यांना निवेदन

खामगाव -: शेतकऱ्यांना मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे कांदा पिकवावा की नाही सध्या बाजारात विक्रीसाठी आलेला कांद्याचे भाव पडले शेतकऱ्यांचा कांदा 600 रु किंट्टल खरेदी होत आहे. त्यामुळे कांदा पेरणी पासून ते काढणीचा ही खर्च निघत नाही पावसाळा तोंडावर आला आहे शेतकऱ्यांचे हाल सुद्धा पाहवले जात नाही कांद्याला भाव नाही कांदा हा जीवनावश्यक आहे कांद्याने केला शेतकऱ्यांचा फार मोठा वांदा कांद्याने शेतकरी फार मोठा अडचणी त सापडला आहे एका बाजूला शेतीची कामगिरी तोंडावर आली असुन कांद्याला ला भाव नाही शेतकऱ्यांनी मारावे की जगावे असा प्रश शेतकऱ्यांना पडला आहे आधीच महागाई चे संकट फार मोठे त्यातच शेतकऱ्यांच्या कांदा हा कवळी मोल भावाने विकावा लागत आहे असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते गिरधर देशमुख यांनी एस डी ओ साहेब यांना निवेदन देतांना त्यांनी शेतकऱ्यांच्या समस्या मांडल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

Related posts

पोलीस विभागातील कर्मचाऱ्यांच्या झाल्या बदल्या

nirbhid swarajya

जनुना येथील ते चार जण निगेटिव्ह

nirbhid swarajya

शहिद जवानाच्या अंत्यसंस्काराची तयारी अंतिम टप्यात

nirbhid swarajya
error: Content is protected !!