April 18, 2025
खामगाव जिल्हा बातम्या बुलडाणा महाराष्ट्र राजकीय विदर्भ

एस टी च्या स्मार्ट कार्ड साठी मिळाली मुदतवाढ;

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाच्या “स्मार्ट कार्ड ” योजनेला 14 ऑगस्ट 2020 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. सध्याच्या परिस्थिती लक्षात घेता या योजनेला 30 नोव्हेंबर 2020 पर्यंत मुदतवाढ देण्यात येत असल्याची माहिती परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचेअध्यक्ष अॅड. अनिल परब यांनी दिली आहे. महाराष्ट्र शासन एसटी महामंडळाच्या माध्यमातून सुमारे 27 विविध सामाजिक घटकांना 33 टक्के पासून 100 टक्के पर्यंत प्रवासी भाड्यामध्ये सवलत देते.

या सवलत योजनेचा लाभ घेण्यासाठीसंबंधित लाभार्थींना आधार क्रमांकाशी निगडीत असलेल्या ” स्मार्ट कार्ड “काढण्याची योजना एसटीने सुरू केली आहे. त्यानुसार एसटीच्या प्रत्येक आगारामध्ये ज्येष्ठ नागरिक व अन्य सवलत धारकांना स्मार्ट कार्ड देण्याची प्रक्रिया सुरू आहे.यामुळे जेष्ठ नागरिकांना दिलासा मिळाला आहे. मात्र 1 डिसेंबर पासून जेष्ठ नागरिकांना राज्य परिवाहनाच्या बसमधुन प्रवासासाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक राहणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

Related posts

Google Home One-ups Amazon Echo, Now Lets You Call phones

admin

चिंचपूर शाळा व्यवस्थापन समितीच्या निवडणुकी मध्ये मुख्याध्यापकाची मनमानी…

nirbhid swarajya

सागवान परिसरात रंगली सापांची प्रणयक्रीडा

nirbhid swarajya
error: Content is protected !!