September 5, 2026
जिल्हा बातम्या

जवाहर नवोदय विद्यालय शेगावचे 21 विद्यार्थी आणि 3 शिक्षक हिमाचल प्रदेश मध्ये अडकले

विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी प्रशासकीय स्तरावर प्रयत्न सुरू 

 शेगाव  : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर देशभर लॉकडाऊन घोषित झाल्यानंतर संपूर्ण वाहतूक व्यवस्था बंद झाल्याने बुलडाणा जिल्ह्यातील २१ विद्यार्थी आणि ३ शिक्षक हिमाचल प्रदेश मधील चेंबा या शहरात अडकले असलायची माहिती समोर आली असून या विद्यार्थ्यांना अद्याप सरकारकडून मदत न मिळाल्यामुळे त्यांचे कुटुंबीय चिंताग्रस्त झाले आहेत. दुसरीकडे या विद्यार्थ्यांना जिल्ह्यात आणण्यासाठी शासकीय स्तरावर प्रयत्न सुरु झाले आहे. सर्व विद्यार्थी हे शेगाव तालुक्यात असलेल्या जवाहर नवोदय विद्यालयाचे विद्यार्थी आहेत.


बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील चिंचोली गावात असलेल्या एकमेव जवाहर नवोदय विद्यालयातील नवव्या वर्गात शिकणाऱ्या 21 विद्यार्थी हिमाचल प्रदेश राज्यातील चेंबा येथे असलेल्या जवाहर नवोदय नवोदय विद्यालयात शिक्षण घेण्यासाठी गेले होते 31 मार्च रोजी त्यांचा शैक्षणिक कार्यकाळ संपणार होता. मात्र त्यापूर्वीच देशभरात लॉकडाऊन ची स्थिती निर्माण झाल्याने तेथील विद्यालयातील सर्व विद्यार्थी आपल्या घरी पाठविले गेले मात्र बुलडाणा जिल्ह्यातील 21 विद्यार्थ्यांना येथील प्रशासनाने परत पाठवले नाही. त्यामुळे हे विद्यार्थी सध्या तेथे अडकून पडले आहेत तर हिमाचल प्रदेश येथीलच राजकोट येथील नवोदय विद्यालयातील ८ विद्यार्थी बुलडाणा जिल्ह्यातील नवोदय विद्यालयात शिकत असल्याने त्यांना येथील विद्यालय प्रशासनाने राजकोट येथे सोडून दिले. मात्र सोबत गेलेले तीन शिक्षकही तेथेच अडकले आहे.

सध्या शिक्षक आणि विद्यार्थी सुखरूप आहेत. मात्र त्यांचे कुटुंबीय चिंताग्रस्त झाले आहे. या विद्यार्थ्यांना जिल्ह्यात आणण्यासाठी शासकीय स्तरावर प्रयत्न सुरु झाले असल्याची माहिती विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र कसरे यांनी दिली आहे.

Related posts

मांडूळ सापाची तस्करी करणारे दोघे पोलिसांच्या जाळ्यात

nirbhid swarajya

एमआयडीसीत गुटखा पकडला

nirbhid swarajya

MacBook Pro Squeezes Fans As iPad Pro Dominates

admin
error: Content is protected !!