October 20, 2026
खामगाव

कृषी उत्पन्न बाजार समीती तर्फे पंतप्रधान साह्यता निधीसाठी ११ लाख

खामगांव :  कोरोना व्हायरसमुळे आलेल्या महामारीसोबत लढण्यासाठी संपूर्ण देश एकजूट झाला आहे. सर्व जण आपापल्या परीने, क्षमतेनुसार यात आपलं योगदान देत आहेत. यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समीती  खामगाव तर्फे पंतप्रधान साह्यता निधी साठी
मदत दिली आहे. आमदार आकाश फुंडकर यांना कृषी उत्पन्न बाजार समीती खामगाव च्या वतीने पंतप्रधान साह्यता निधीसाठी ११ लाख रुपयांचा चेक सुपूर्द केला आहे. आकाश फुंडकर यांनी तहसिलदार शितलकुमार रसाळ यांना हा चेक पंतप्रधान साह्यता निधि जमा करण्यासाठी सांगितले आहे. यावेळी भाजपा नेते सागर फुंडकर, सभापती संतोष टाले, संचालक विठ्ठलराव लोखंडकार, संचालक दिलीपजी पाटील, अशोकराव हटकर, न.प. मुख्याअधिकारी श्री.धनंजय बोरीकर, सचिव कृ.उ.बा. मुगूटराव भिषे आदींची उपस्थिती होती.

Related posts

उत्तर प्रदेश मधील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्यांवर कारवाई करा- ऑल इंडिया पँथर सेनेची मागणी

nirbhid swarajya

बोरजवळा ग्रामसेवा सहकारी संस्थेवर ग्रामविकास पॅनलचे वर्चस्व

nirbhid swarajya

ओबीसी जनगणनेच्या मागणीला विरोध नाही, टिकणारे मराठा आरक्षण देणार : फडणवीस

nirbhid swarajya
error: Content is protected !!