July 22, 2026
खामगाव

३४ वर्षीय विवाहितेची आत्महत्या

खामगाव : वनारे ले आउट भागात एका ३४ वर्षीय विवाहितेने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना सकाळच्या सुमारास उघड़किस आली. मिळालेल्या माहितीनुसार येथील वनारे ले ऑऊट भागातील सौ दिपाली वनारे या विवाहितेने काल रात्री दरम्यान परिसरातील विहीरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. सदर घटना दिनांक २० एप्रिल २०२० रोजी सकाळच्या सुमारास परिसरातील नागरीकांना विहिरीमध्ये एका महिलेचा मृतदेह तरंगतांना दिसून आल्याने त्यांनी घटनेची माहिती शहर पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहचून नागरिकांच्या मदतीने महिलेचा मृतदेह विहिरीबाहेर काढून त्याची ओळख पटविण्यात आली . याप्रकरणी मृतक दिपाली वनारे हिचा भाऊ विनायक टिकार यांनी दिलेल्या फिर्यादित नमूद आहे की, दिपाली अरुण वनारे (३४) ही आपल्या पती, सासू ,सासरे , जेठ व जेठानी यांच्या सोबत राहते तरी जेठाणी जयश्री राजेश वनारे ही दिपाली हिला शारीरिक व मानसिक त्रास देत होते, या त्रासाला कंटाळून दिपाली वनारे हिने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली.फिर्यादीच्या तक्ररीवरून शहर पोलिसांनी याप्रकरणी जेठानी सौ जयश्री राजेश वनारे विरूद्ध भादवी कलम ३०६ नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास api कांबळे करीत आहे.

Related posts

एन . व्ही . चिन्मय विद्यालयाच्या दहावीच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश.      

nirbhid swarajya

वडिलांनंतर तरुण मुलाचाही कोरोनाने मृत्यू

nirbhid swarajya

खंडणीखोर सरकारचा भाजपा तर्फे जाहीर निषेध

nirbhid swarajya
error: Content is protected !!