October 20, 2026
अकोला अमरावती खामगाव चिखली जळगांव जामोद जिल्हा नागपुर नांदुरा पुणे बातम्या बुलडाणा मलकापूर महाराष्ट्र मुंबई मेहकर मोताळा लोणार विदर्भ विविध लेख शेगांव संग्रामपूर सामाजिक

सैनिकांसाठी प्रॉपर्टी संदर्भात विनामूल्य सेवा

‘होप्स प्रॉपर्टी सर्व्हिसेसचा’ स्तुत्य उपक्रम…

खामगांव : देशभक्तीने प्रेरित प्रत्येक भारतीय नागरिकाला देशासाठी काहीतरी करावे असे वाटत असते. परंतु काय करावे? असा प्रश्न सहज निर्माण होतो.मात्र आपण आपल्या व्यवसायाच्या माध्यमातूनही देश सेवा करू शकतो हे होप्स प्रॉपर्टी सर्व्हिसेसचे संचालक संदीप (बंटी) पहुरकर यांनी दाखवून दिले असून एक नवीन आदर्श देशभक्तांसाठी निर्माण केला आहे.भारतमातेचे रक्षण करणाऱ्या सैनिकांची सेवा करूनही देश सेवेत खारीचा वाटा उचलण्याचा उपक्रम बंटी पहुरकर यांनी १५ ऑगस्ट २०२३ स्वातंत्र्य दिनापासून सुरु केला आहे.संपूर्ण महाराष्ट्रात प्रॉपर्टी संदर्भात २४ तास सेवा देणाऱ्या होप्स प्रॉपर्टी सर्व्हिसेसच्या माध्यमातून सैनिकांना प्रॉपर्टी खरेदी- विक्री करावयाची असल्यास तसेच, प्रॉपर्टी बद्दल माहिती हवी असल्यास विनामुल्य सेवा देण्यात येणार आहे. यासाठी इच्छुकं सैनिकांनी मो नं. ९९७०४२७२९५ व ८२०८१३८७६३ यावर संपर्क साधावा,असे आवाहन बंटी पहूरकर यांनी केले आहे.

Related posts

अतिक्रमणधारकाने पेट्रोल घेतले अंगावर प्रशासनाशी घातला वाद…

nirbhid swarajya

श्री राम मंदीराचा पायाभरणी समारंभ दिवाळी सणाप्रमाणे साजरा करावा – आ.आकाश फुंडकर

nirbhid swarajya

भरड धान्य योजनेअंतर्गत महाराष्ट्रात मका व ज्वारी खरेदीचा निर्णय

nirbhid swarajya
error: Content is protected !!