September 4, 2026
अमरावती खामगाव जिल्हा बातम्या बुलडाणा ब्लॉग महाराष्ट्र मुंबई विदर्भ विविध लेख सामाजिक

सुटाळा बुद्रुक येथे श्रीहरी कीर्तन व अखंड हरिनाम सप्ताह…

खामगांव: सुटाळा बुद्रुक येथील महादेव संस्थान येथे पुरुषोत्तम मासानिमित्त १८ जुलै ते १६ ऑगस्ट २०२३ पर्यंत नाथ भागवत श्रीहरी कीर्तन व अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.
यामध्ये दररोज सकाळी पाच ते सहा काकडा आरती, सकाळी सहा ते सात श्री विष्णु सहस्रनाम, सकाळी सात ते आठ वाजेपर्यंत ग्रंथ पूजन, सकाळी साडेनऊ ते दुपारी बारा वाजेपर्यंत भागवत कथा व दुपारी तीन ते पाच वाजेपर्यंत पुरुषोत्तम मास महिमा, दुपारी पाच ते सायंकाळी साडेसहा पर्यंत हरिपाठ व रात्री आठ ते दहा वाजेपर्यंत नामवंत कीर्तनकारांचे कीर्तन होणार आहे.

भागवताचार्य ह.भ.प. विनायक महाराज भोपळे निमगाव यांच्या अमृततुल्य वाणीतून कथा वाचन होणार आहे. बाहेर गावावरून येणाऱ्या भाविकांची निवास व भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. तरी भाविक भक्तांनी कथा श्रवणाचा लाभ घ्यावा असे आव्हान सप्ताह समितीचे अध्यक्ष विजय (बंडू)बोदडे यांनी केले आहे.

Related posts

खामगाव तालुक्यातील ग्रामपंचायत इंटरनेटद्वारे जोडण्यासाठी “भारत नेट” चा कारभार चालतो फक्त व्हाट्सअप वरच…

nirbhid swarajya

भाजपा तालुका महिला आघाडीचा हळदी कुंकू कार्यक्रम उत्साहात साजरा

nirbhid swarajya

मानाच्या नऊ पालख्यांना पायदळ वरीला परवानगी द्यावी

nirbhid swarajya
error: Content is protected !!