October 20, 2026
बुलडाणा

सागवान परिसरात रंगली सापांची प्रणयक्रीडा

नागरिकांना जवळून पाहण्याचा आला अनुभव

बुलडाणा : सापांच्या प्रणयक्रीडेचा एक विशिष्ठ कालावधी असतोय, त्यामुळे त्यांची प्रणयक्रीडा पाहणे हे दुर्मिळ आहे. बुलडाणा जिल्ह्यातील सागवान येथे धामण जातीच्या सापांची प्रणयक्रीडा पाहण्याचा योग गुरुवारी सायंकाळी गावातील अनेकांना जवळून अनुभवता आला आहे.  साधारण मार्च – एप्रिल महिन्यात सापांचा मिलनाचा काळ असतो, दरम्यान सागवान येथील संगीता जाधव यांच्या घरासमोरील मोकळ्या जागेत दोन दिवसांपूर्वी  सायंकाळी धामण जातीच्या बिनविषारी सापांची प्रणयक्रीडा सुरु असल्याची बातमी वाऱ्यासारखी गावात पसरली आणि पाहता पाहता याठिकाणी गर्दी झाली. 

दोन्ही सापांनी एकमेकांना विळखा घातला होता आणि ३ ते ४ फूट उंच शरीर करून फण्यांना स्पर्श करत होते. गावातील अनेकांनी हा दुर्मिळ अनुभव पहिला. या सापांविषयी आणि मिलनाविषयी अनेक गैरसमज आहेत, सापाचं मिलन पाहिले कि धनलाभ होतॊ अशिही आख्यायिका आहे. यानंतर सर्पमित्र श्रीराम रसाळ यांनी या दोन्ही सापांना पकडून जंगलात सोडले.

Related posts

भाजप कार्यालयात पोलीस व शसत्रबल भरती साठी दोन दिवसीय मोफत ऑनलाईन अर्ज भरता येणार, लाभ घेण्याचे आवाहन…

nirbhid swarajya

युथ पॅंथरच्या वतीने एक दिवसीय लाक्षणिक उपोषण

nirbhid swarajya

ज्ञानगंगा अभयारण्यात C-1 वाघासह वन्यप्राण्यांचा मुक्तसंचार

nirbhid swarajya
error: Content is protected !!