September 4, 2026
बुलडाणा

संग्रामपूर तालुक्यात वादळी वाऱ्यासह रिमझिम पाऊस, पिकांवर परिणाम ..

बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील वरवट बकाल सह इतर ठिकाणी आज सकाळी वादळी वाऱ्यासह रिमझिम पाऊस पडलाय .. यामुळे वातावरण आणखीनच थंड झालेय .. मात्र या पावसामुळे शेतकऱ्यांनी पेरलेल्या पिकांवर परिणाम होण्याची शक्यता आहे .. जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरण असून पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव झालाय .. तर काही परिसरात धुके पडल्याने ही पिकांवर परिणाम झालाय .. हरभरा, गहू ही पीक पिवळी पडली असुन सुकलीय .. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय.. तर आज सकाळी पाऊस झाल्याने वातावरण आणखी थंड झाल्याने आणि ढगाळ वातावरण असल्याने पिकांवर परिणाम होणार हे मात्र निश्चित ..

Related posts

महिला पोलीस कॉन्स्टेबल यांनी दारू विक्रेत्यास रंगेहात पकडले

nirbhid swarajya

शेगाव पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार दिनानिमित्त….

nirbhid swarajya

आदर्श पंतप्रधान स्व.अटलिहारी यांचे स्वप्न आज आपल्यासोर पूर्ण होत आहे, आपण मोठे भाग्यवान:-आ.अँड फुंडकर

nirbhid swarajya
error: Content is protected !!