September 5, 2026
खामगाव शेतकरी

शेत तळ्यातील प्लास्टिक पन्नी लंपास

खामगांव : अनिकट रोड भागातील रहिवासी सौ.अलका केशव बोराडे यांनी काल १० जुलै रोजी ग्रामीण पोलिस स्टेशनला तक्रार केली आहे. त्यामध्ये अशा आशयाचे नमूद करण्यात आले आहे की, निळेगाव शिवारामधील गट क्र. ५१ मध्ये १६२ आर. शेती असून शेतात कृषी विभागामार्फत शेततळे तयार करण्यात आले आहे. शेततळ्यात पाणी जिरून जाऊ नये म्हणून ५०० मायक्रॉन जाडीची प्लास्टीक पत्री (किं.२ लाख ३७ हजार रू.) आंथरली आहे. ९ जुलैच्या रात्री ९ वाजतापुर्वी अज्ञात चोरट्याने प्लास्टीक पन्नीमधून २५० चौ.फूट (किं.२२ हजार ७५० रू.) पन्नी कापून चोरून नेली. अशा आशयाच्या तक्रारीवरून अज्ञात चोरटया विरुध्द ग्रामीण पोलिसांनी भादंवि कलम ३७९ अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोहेका सुनिल राऊत करीत आहेत.

Related posts

पहिला ‘मूकनायक’ पुरस्कार पत्रकार राहुल पहुरकर यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान

nirbhid swarajya

आदिवासी समाज बांधवांच्या समस्या सोडविणार-पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे

nirbhid swarajya

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने अकलूज एस.टी.आगार प्रमुखकाला दिले निवेदन..

nirbhid swarajya
error: Content is protected !!