September 4, 2026
गुन्हेगारी जिल्हा बातम्या बुलडाणा महाराष्ट्र विदर्भ शेगांव

शेगाव बसस्थानकावर इसमाच्या खिशातून २१ हजार चोरले,पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…

शेगाव : जळगाव जामोद तालुक्यातील खेड येथील दिनकर रामभाऊ टाकसाळ हे शेगाव येथे राहणाऱ्या त्यांच्या बहिणीला आणायला शेगाव येथे गेले होते शेगाव येथे बस स्थानकावर सध्या दिवाळी सुट्ट्या निमित्त प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी आहे अगदी चोरट्याने गर्दीचा फायदा उचलून, त्यांच्या खिशातून अज्ञात चोरट्याने नगदी २१ हजार रुपये चोरल्याची घटना ३० ऑक्टोबर रोजी दुपारी चार वाजे दरम्यान घडली.याप्रकरणी मंगेश दिनकर टाकसाळ यांनी शेगाव पोलीस चौकी मध्ये जाऊन पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून शेगाव पोलिसांनी आज 31 ऑक्टोंबर रोजी रात्री अज्ञात आरोपीविरुद्ध कलम ३७९ भादंवीन्वये गुन्हा नोंदविला आहे.तपास पोहेका मुरलीधर वानखडे हे करीत आहेत.

Related posts

जिल्ह्यातील आज प्राप्त पाच रिपोर्ट ‘निगेटीव्ह’

nirbhid swarajya

विना अनुदानित शिक्षकांवर उपासमारीची वेळ

nirbhid swarajya

इयत्ता 10 वीचा जिल्ह्याचा निकाल 96.10 टक्के ; अमरावती विभागातून जिल्हा प्रथम

nirbhid swarajya
error: Content is protected !!