September 4, 2026
अमरावती खामगाव गुन्हेगारी जळगांव जामोद जिल्हा नागपुर नांदुरा पुणे बातम्या बुलडाणा मलकापूर महाराष्ट्र मुंबई विदर्भ विविध लेख व्यापारी शेगांव संग्रामपूर

रेती तस्कर कोतवालाला घेऊन पळाला गाडी खाली करून तहसीलमध्ये आला.

खामगाव : तलाठी व कोतवाल यांनी आज दुपारी ४ वाजताचे सुमारास सुटाळा खुर्द येथे अवैद्य रेती वाहतूक करणारे वाहन पकडले. यावेळी वाहन तहसील मध्ये जमा करण्यासाठी कोतवाल वाहनात बसले असता रेती तस्कर चक्क कोतवालाला घेऊन पसार झाला व गाडीखाली करून तहसील मध्ये दाखल झाल्याची घटना घडली.आज २५ जुलै २०२३ रोजी दुपारी ४ वाजताच्या सुमारास सुटाळा खुर्द येथील तलाठी अंभोरे व कोतवाल गोपीचंद गीते यांना सुटाळा खुर्द गावात विना नंबरची ४०७ गाडी अवैधरित्या रेती घेऊन जाताना दिसली सदर वाहनाला हात दिल्यानंतर चालकाने गाडी थांबवली नाही.त्यामुळे तलाठी व कोतवाल यांनी पाठलाग करून अखेर गाडी पकडली यावेळी सदर वाहन तहसील मध्ये नेण्यासाठी तलाठी यांनी कोतवालाला वाहनात बसविले मात्र चालकाने वाहन तहसील मध्ये नेण्याऐवजी लॉयन्स ज्ञानपीठ मार्गे घाटपुरीकडे सुसाट घेऊन गेला व रेतीची गाडी खाली केल्यानंतर काहीवेळाने कोतवालासह तहसीलमध्ये आला याबाबत तक्रार देण्यासाठी तलाठी व कोतवाल शहर पो.स्टे मध्ये गेले होते. वृत्तलेपर्यंत अधिक माहिती मिळू शकली नाही

Related posts

मालमत्ता व इतर करांचा घोळ दूर करून द्या

nirbhid swarajya

बँक खाते क्लोन करुन १ लाख १५ हजार रु. उडविले

nirbhid swarajya

जिल्हयात आज प्राप्त ५२ कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’

nirbhid swarajya
error: Content is protected !!