September 4, 2026
खामगाव जिल्हा बातम्या बुलडाणा शिक्षण शेतकरी

बुलडाणा – बोथा – खामगाव मार्ग ३० दिवस राहाणार बंद

बोथा मार्ग वळविण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

बुलडाणा : विदर्भाची वनपंढरी म्हणून ओळख असलेल्या ज्ञानगंगा अभयारण्यातून जाणाऱ्या रस्त्याच्या नुतनीकरण व मजबुतीकरणाच्या कामाला मान्यता मिळाली आहे. कंत्राटदाराने यासाठी ३० दिवसांचे नियोजन केले असून ३० जानेवारी ते २८ फेब्रूवारी दरम्यान बुलडाणा- बोथा- खामगाव मार्ग बंद करून हा मार्ग बुलडाणा- वरवंड- उंद्री- खामगाव या पर्यायी मार्गाने वळविण्यात आल्याचे आदेश आज जिल्हाधिकारी यांनी निर्गमित केले आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून या रस्त्याचे काम संथगतीने सुरू होते. मात्र आता हा रस्ता बंद केल्यावर तरी या रस्त्याचे काम वेगाने होईल अशी नागरिकांमधे चर्चा आहे. खामगाव बुलढाणा मार्ग रात्री ९:३० ते सकाळी ६ पर्यंत बंद ठेवण्यात येत असतो,मात्र आता तीस दिवसांसाठी हा रस्ता बंद करण्यात आला आहे.त्यामुळे प्रशासनाने दिलेल्या पर्यायी मार्गाने प्रवाशांना प्रवास करावा लागणार आहे.

Related posts

गणेश जयंतीनिमित्त दगडूशेट गणपती मंदिराच्या गाभा-यात शेषनागाच्या प्रतीकृतीची केली आकर्षक पुष्पसजावट…

nirbhid swarajya

खामगाव शेगाव रोड वरील सबस्टेशनची पडलेली भिंत धोकादायक स्थितीत;मोठा अपघात होण्याची शक्यता

nirbhid swarajya

हनुमान सागर धरणातून पाण्याचा 64.85 घ. मी. से. विसर्ग, 4 वक्रद्वारे 50 से. मी. नी उघडले, नदीकाठच्या 14 गावांना सतर्कतेचा इशारा.

nirbhid swarajya
error: Content is protected !!