July 21, 2026
महाराष्ट्र

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान राजगृहावर अज्ञातांकडून तोडफोड

मुंबई : विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईतील निवासस्थान असलेले ‘राजगृहा’वर आज संध्याकाळी दोन अज्ञात व्यक्तींकडून तोडफोड करण्यात आली. यात घराच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमऱ्यांची तोडफोड केली आहे. तसेच घराच्या काचांवरही दगडफेक झाली आहेत. यात घरातील कुंड्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
राजगृह हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान आहे. बाबासाहेब आंबेडकर यांनी पुस्तकांसाठी हे घर बांधले होते. जगभरातील आंबेडकर अनुयायी येथे दररोज भेटीला येत असतात. इतकं महत्त्वाचे हे स्थान आहे. आंबेडकर अनुयायांसाठी हे महत्त्वाचे ठिकाण आहे. आज संध्याकाळच्या सुमारास दोन माथेफिरुंनी हा प्रकार केलाय. यात त्यांनी घराबाहेरील CCTV चेही मोठे नुकसान केलं आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. आंबेडकर कुटुंबियांकडून घटनेचे CCTV फुटेज पोलिसांना देण्यात आले आहे.आरोपींचा तातडीने शोध घेऊन अटक करण्याची मागणी करण्यात येत आहे.अशी माहिती वंचीत बहुजन आघाडी चे प्रसिद्धी प्रमुख सुरेश नंदिरे मुंबई यांनी दिली आहे.

Related posts

मी पाहिलेले कुटुंबप्रमुख ते मुख्यमंत्री

nirbhid swarajya

खामगांव नगरपरिषद कडून सेटलमेंट कारवाई….?

nirbhid swarajya

शेगावला शुक्रवारी “भारतीय संस्कृतीचे जतन प्रत्येकाची जबाबदारी”विषयावर अविनाश भारतींचे जाहीर व्याख्यान…

nirbhid swarajya
error: Content is protected !!