September 8, 2026
आरोग्य बुलडाणा

जिल्ह्यात सध्या 17 कोरोना बाधीत रूग्ण

बुलडाणा : जिल्ह्यात एकूण 21 रूग्ण कोरोना पॉझीटीव्ह आढळलेले असून त्यापैकी एक मृत आहे. उर्वरित 20 रूग्णांवर कोविड रूग्णालयात उपचार सुरू होते. त्यापैकी  तीन रूग्णांचे नमुने निगेटीव्ह आले असून त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे रूग्णालयातून डिस्जार्ज देण्यात आला आहे, तर उर्वरित 17 रूग्णांवर रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
  तसेच आज 17 एप्रिल रोजी 19 अहवाल प्राप्त झाले आहेत. हे सर्व 19 अहवाल निगेटीव्ह आहेत. तसेच आज रोजी अहवालाच्या प्रतिक्षेत असलेले नमुने 21 आहेत आणि कोविड रूग्णालयात उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रूग्ण 17 आहेत, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. आर. जी पुरी यांनी दिली आहे.

 सौजन्य : जि.मा.का    

Related posts

खामगाव राष्ट्रवादी तर्फे अब्दुल सत्ताराचा निषेध करत केले आंदोलन…

nirbhid swarajya

चिखली अर्बन कडून शेतकऱ्याना ट्रॅक्टर वाटप

nirbhid swarajya

संपुर्ण पोलिस स्टेशनच क्वारंटीन!

nirbhid swarajya
error: Content is protected !!