June 5, 2026
आरोग्य जिल्हा बुलडाणा

जिल्ह्यात आज 97 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर 18 पॉझिटिव्ह

दोन रूग्णांची कोरोनावर मात


बुलडाणा: प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या अहवालांपैकी 115 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 97 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 18 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये नांदुरा येथील 28 वर्षीय पुरूष, दाल फैल खामगांव येथील 43 वर्षीय महिला, 17 वर्षीय तरूणी, 23 वर्षीय पुरूष, 13 वर्षीय मुलगी व 26 वर्षीय पुरूष, तसेच कदमपूरा खामगांव येथील 52 वर्षीय महिला, 58 वर्षीय पुरूष, 24 वर्षीय महिला व 18 वर्षीय पुरूष रूग्णाच्या अहवालाचा समावेश आहे. अशाप्रकारे खामगांव तालुक्यात 9 रूग्ण आढळले आहे. तसेच पारपेठ मलकापूर येथील 8 वर्षीय मुलगा, अमोना ता. चिखली येथील 30 वर्षीय पुरूष, साखरखेर्डा ता. सिं.राजा येथील 19 वर्षीय तरूण, 55 वर्षीय महिला, 60 वर्षीय पुरूष, 40 वर्षीय पुरूष, मूळ पत्ता देऊळगांव ता. जामनेर, जि. जळगांव असलेल्या 65 वर्षीय महिला आणि बुलडाणा येथील 19 वर्षीय तरूण संशयीत रूग्ण पॉझीटीव्ह आले आहे. अशाप्रकारे 18 अहवाल पॉझीटीव्ह प्राप्त झाले आहे.
तसेच आज 2 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामध्ये हाश्मी नगर मलकापूर येथील 35 वर्षीय महिला व धामणगांव बढे ता. मोताळा येथील 9 वर्षीय मुलाचा समावेश आहे. तसेच आजपर्यंत 2698 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 154 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 154 आहे. तसेच आज 1 जुलै रोजी 115 अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये 18 पॉझीटीव्ह, तर 94 निगेटीव्ह आहेत. आज रोजी 219 नमुने अहवालाच्या प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 2698 आहेत. जिल्ह्यात आजअखेर एकूण 253 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 154 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात 87 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 12 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

Related posts

जिल्ह्यात लॉकडाऊन 31 ऑगस्टपर्यंत वाढविली

nirbhid swarajya

आग लागल्याने हॉटेल जळाले; सुदैवाने जीवितहानी नाही

nirbhid swarajya

बाजार समिती मधील २ व्यापारी नॉट रिचेबल

nirbhid swarajya
error: Content is protected !!