September 5, 2026
आरोग्य जिल्हा

जिल्ह्यात आज प्राप्त 46 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर 05 पॉझिटिव्ह

दोन रूग्णांना मिळाली सुट्टी

बुलडाणा : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या अहवालांपैकी 51 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 51 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 05 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. सदर अहवाल खामगांव येथील पुरवार गल्ली भागातील 27 वर्षीय महिला, बुलडाणा शहरातील वावरे ले आऊट भागातील 33 वर्षीय महिला, शेलापूर, ता. मोताळा येथील 25 वर्षीय महिला व 28 वर्षीय पुरूष आणि पलढग ता. मोताळा येथील 19 वर्षीय तरूणीचा आहे. यामध्ये खामगांव येथील पॉझीटीव्ह अहवाल हा आधीच्या कोरोनाबाधीत रूग्णाच्या निकट संपर्कातील आहे. तसेच बुलडाणा, पलढग व शेलापूर ता. मोताळा येथील अहवाल मुंबई प्रवास इतिहास असलेल्या व्यक्तींचे आहे.
त्याचप्रमाणे आज बुलडाणा कोविड रूग्णालयातून दोन रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. तसेच आतापर्यंत 1416 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. जिल्ह्यात एकूण 82 कोरोनाबाधित रूग्ण आहेत. त्यापैकी तीन मृत आहे. आतापर्यंत 49 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 49 आहे. सध्या रूग्णालयात 29 कोरोनाबाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत.
तसेच आज 5 जुन रोजी 51 अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये 05 पॉझीटीव्ह, तर 46 निगेटीव्ह आहेत. आज रोजी अहवालाच्या प्रतिक्षेत असलेले नमुने 51 आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 1416 आहेत, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. आर. जी पुरी यांनी दिली आहे.

Related posts

बुलडाणा जिल्ह्यात एकाच दिवशी आढळले 22 कोरोना पॉझिटिव्ह

nirbhid swarajya

ग्रामीण भागातील एसटी बस सेवा सुरु करा

nirbhid swarajya

जिल्ह्यात आज प्राप्त 53 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर 03 पॉझिटिव्ह

nirbhid swarajya
error: Content is protected !!