September 5, 2026
आरोग्य

जिल्ह्यात आज प्राप्त 41 कोरोना अहवाल ‘निगेटीव्ह’; तर 9 पॉझीटीव्ह

6 रूग्णांनी केली कोरोनावर मात

बुलडाणा : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या अहवालांपैकी 50 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 41 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 9 अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवाल हे पारपेट, मलकापूर येथील 60 वर्षीय महिला, 3 वर्षीय मुलगी, 10 व 12 वर्षीय मुलगी, पातुर्डा ता. संग्रामपूर येथील 65 वर्षीय पुरूष, 30 वर्षीय पुरूष, 25 वर्षीय पुरूष, 18 वर्षीय युवक रूग्णाचे आहेत.  तसेच बाळापूर जि. अकोला येथील 52 वर्षीय पुरूष रूग्णाचा अहवाल शेगांव येथे पॉझीटीव्ह आला आहे.
  तसेच आज 6 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना कोविड केअर सेंटर येथून सुट्टी देण्यात आली आहे. त्यामध्ये खामगांव येथून भीमनगर, मलकापूर येथील 75 वर्षीय पुरूष रूग्णाला सुट्टी देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे बुलडाणा येथून 38 वर्षीय पुरूष चैतन्यवाडी, मलकापूर, 10 वर्षीय मुलगा 40 बीघा मलकापूर, 40 वर्षीय पुरूष मलकापूर, 58 वर्षीय महिला जाधववाडी, मलकापूर व 39 वर्षीय पुरूष गाडेगांव मलकापूर येथील रूग्णांना सुट्टी देण्यात आली आहे.   आतापर्यंत 87 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 87 आहे.  सध्या रूग्णालयात 50 कोरोनाबाधीत रूग्णांवर उपचार  सुरू आहेत.  तसेच आतापर्यंत 1914 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. जिल्ह्यात एकूण 142 कोरोनाबाधित रूग्ण आहेत. त्यापैकी पाच मृत आहे. तसेच आज 17 जुन रोजी 50 अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये 09 पॉझीटीव्ह, तर 41 निगेटीव्ह आहेत.  आज रोजी अहवालाच्या प्रतिक्षेत असलेले नमुने  60 आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 1914 आहेत, अशी माहिती निवासी उप जिल्हाधिकारी यांनी दिली आहे.                                           


Related posts

जिल्ह्यातील आणखी 8 नगर परिषदांचे क्षेत्र प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून घोषीत

nirbhid swarajya

सुद्दढ शरीरयष्टी हेच खरे धन होय:-रमेश कंडारकर

nirbhid swarajya

४८ वर्षीय इसमाची गळफास घेऊन आत्महत्या

nirbhid swarajya
error: Content is protected !!