September 5, 2026
आरोग्य जिल्हा

जिल्ह्यात आज प्राप्त 30 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर 02 पॉझिटिव्ह

बुलडाणा : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या अहवालांपैकी 32 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 30 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 02 अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवाल हे मलकापूर येथील 75 वर्षीय वृध्द पुरुष आणि 58 वर्षीय महिला रुग्णाचा आहे. त्याचप्रमाणे आज बुलडाणा कोविड रुग्णालयातून मलकापूर येथील 3 रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉल प्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. यामध्ये मलकापूर येथील 50 व 27 वर्षीय महिला, 10 वर्षीय मुलाचा समावेश आहे. हे सर्व पूर्वी आलेल्या 38 वर्षीय कोरोनाबाधीत पुरुषाच्या निकट संपर्कातील होते. तसेच आतापर्यंत 1461 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. जिल्ह्यात एकूण 85 कोरोनाबाधित रूग्ण आहेत. त्यापैकी तीन मृत आहे. आतापर्यंत 53 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 53 आहे. सध्या रूग्णालयात 29 कोरोनाबाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आज 7 जुन रोजी 32 अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये 02 पॉझीटीव्ह, तर 30 निगेटीव्ह आहेत. आज रोजी अहवालाच्या प्रतिक्षेत असलेले नमुने 93 आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 1461 आहेत, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. आर. जी पुरी यांनी दिली आहे

Related posts

धक्कादायक,कोरोनामुळे डोणगाव पोलीस स्टेशन सील,कामकाज मेहकर कडे दिले

nirbhid swarajya

प्रसाद डांगे ची वैद्यकीय शिक्षणाकरीता निवड….

nirbhid swarajya

सुटाळा बु.येथील शोरूम मधील जळालेल्या युवकाचा अखेर मृत्यू…

nirbhid swarajya
error: Content is protected !!