September 5, 2026
आरोग्य जिल्हा

जिल्ह्यात आज प्राप्त 15 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर 01 पॉझिटिव्ह

बुलडाणा : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या अहवालांपैकी 18 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 15 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 01 अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तसेच दोन अहवाल तपासणीसाठी पुन्हा पाठविण्यात आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवाल हा चैतन्य वाडी, मलकापूर येथील 38 वर्षीय पुरुष रुग्णाचा आहे.
तसेच आतापर्यंत 1430 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. जिल्ह्यात एकूण 83 कोरोनाबाधित रूग्ण आहेत. त्यापैकी तीन मृत आहे. आतापर्यंत 50 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 50 आहे. सध्या रूग्णालयात 30 कोरोनाबाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत.
तसेच आज 6 जुन रोजी 18 अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये 01 पॉझीटीव्ह, तर 15 निगेटीव्ह आहेत. आज रोजी अहवालाच्या प्रतिक्षेत असलेले नमुने 54 आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 1430 आहेत, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. आर. जी पुरी यांनी दिली आहे.

Related posts

बर्डे प्लॉट येथे गुटखा जप्त; आरोपी फरार

nirbhid swarajya

चौधरी वाईन शॉपमधून गैर कायदेशीर दारू विक्री राज्य उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांचा छापा

nirbhid swarajya

उत्तर प्रदेश मधील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्यांवर कारवाई करा- ऑल इंडिया पँथर सेनेची मागणी

nirbhid swarajya
error: Content is protected !!