September 4, 2026
आरोग्य जिल्हा बुलडाणा

जिल्ह्यात आज प्राप्त 102 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर 34 पॉझिटिव्ह

18 रूग्णांना मिळाली सुट्टी


बुलडाणा : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 136 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 102 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 34 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 32 व रॅपिड टेस्टमधील 2 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 86 तर रॅपिड टेस्टमधील 16 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 102 अहवाल निगेटीव्ह आहेत.
पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : खामगाव: टापरे नगर 1, गांधी चौक 1, घाटपुरी नाका 1, वामन नगर 1, साखर खेरडा ता. सिंदखेड राजा: 2, मलकापूर: हनुमान चौक 1, धाड ता. बुलडाणा: 1, मासरुळ ता. बुलडाणा: 1, चिखली :2, हातनी ता. चिखली: 1, बुलडाणा: 1, दे. राजा: बालाजी फरस 3, माळी पुरा 2, लोणार: 8, मोताला : 1, शेळगाव आटोळ ता. चिखली: 1, शेवगा ता. चिखली : 1, मेहकर: 2, नांदुरा: शिवाजी नगर 3 संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 34 रूग्ण आढळले आहे.
तसेच आज 18 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.
सुट्टी देण्यात आलेले रूग्ण पुढीलप्रमाणे : सुलतानपूर ता.लोणार: 2, ठालेगाव ता. लोणार: 1, धामणगाव बढे ता. मोताळा : 1, शेगाव: 1, सुरभी कॉलनी 1, आदर्श कॉलनी 1, हाय फाय कॉलनी 1, धानोकार नगर 1, पिंपळगाव काळे ता. जळगाव जामोद: 1, झोडगा वसर ता. खामगाव: 1, खामगाव: जुना फैल 3, अनिकेत रोड 2, शिवाजी वेस 2.
तसेच आजपर्यंत 14835 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 1589 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 1589 आहे. आज रोजी 279 नमुने अहवालाच्या प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 14835 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 2471 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 1589 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात 841 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 41 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उप जिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

Related posts

रागाच्या भरात दारुड्या पतीने केली पत्नीची हत्या

nirbhid swarajya

अवैध गुटखा विक्री करणाऱ्या दोन व्यवसायिकां विरुद्ध गुन्हा दाखल

nirbhid swarajya

योगदिनी जिजाऊ स्कुल ऑफ स्कॉलर व गुंजकर कॉलेजच्या नवीन सत्रास प्रारंभ

nirbhid swarajya
error: Content is protected !!