September 4, 2026
आरोग्य जिल्हा

जिल्ह्यात आज प्राप्त ३३ कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’;तर ०३ पॉझिटिव्ह

बुलडाणा :  प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या अहवालांपैकी ३६ अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी ३३ अहवाल कोरोना निगेटिव्ह असून ०३ अहवाल काल रात्री पॉझिटिव्ह आले आहेत. पॉझिटिव आलेले अहवाल मलकापूर येथील २७ वर्षीय व ५० वर्षीय महिला, १० वर्षीय मुलाचा आहे. सदर अहवाल यापूर्वी पॉझिटिव आलेल्या रुग्णाच्या निकट संपर्कातील आहेत. आतापर्यंत १२३६ रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. जिल्ह्यात एकूण ५९ कोरोनाबाधित रूग्ण आहेत. त्यापैकी तीन मृत आहे.  आतापर्यंत ३३ कोरोनाबधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या ३३ आहे.  सध्या रूग्णालयात २३ कोरोनाबाधीत रूग्णांवर उपचार  सुरू आहेत.   तसेच आज ३१ मे रोजी ३६ अहवाल प्राप्त झाले आहेत. तसेच आज रोजी अहवालाच्या प्रतिक्षेत असलेले नमुने ४८ आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल १२३६ आहेत, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. आर. जी पुरी यांनी दिली आहे.

Related posts

खडकपूर्णा चे 5 दरवाजे उघडले

nirbhid swarajya

देहव्यापार करताना दोघांना अटक ; गुन्हा दाखल

nirbhid swarajya

गँस सिलेंडर डिलेव्हरी करणाऱ्यांना ऑनलाईन खात्यांचे टार्गेट

nirbhid swarajya
error: Content is protected !!