September 6, 2026
आरोग्य बुलडाणा

जिल्हयात आज प्राप्त ६ कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’

बुलडाणा : जिल्ह्यात एकूण २१ रूग्ण कोरोना पॉझीटीव्ह आढळलेले असून त्यापैकी एक मृत आहे. उर्वरित २० रूग्णांवर कोविड रूग्णालयात उपचार सुरू होते. त्यापैकी १७ एप्रिल रोजी तीन रूग्णांचे नमुने निगेटीव्ह आले असून त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे रूग्णालयातून डिस्जार्ज देण्यात आला, तर आज २० एप्रिल रोजी रूग्णांचे कोरोना दुसऱ्यांदा अहवाल निगेटीव्ह आल्यामुळे वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे त्यांना रूग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. सुटी देण्यात आलेल्या रूग्णांची संख्या ८ झाली असून सध्या रूग्णालयात १२ रूग्ण उपचार घेत आहेत.

रूग्णालयात सध्या १२ रूग्णांवर उपचार सुरू आहेत तसेच आज २० एप्रिल रोजी ६ अहवाल प्राप्त झाले आहेत. हे सर्व ६ अहवाल निगेटीव्ह आहेत. तसेच आज रोजी अहवालाच्या प्रतिक्षेत असलेले नमुने ५ आहेत. कोविड रूग्णालयात उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रूग्ण १२ आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल २९७ आहेत, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. आर. जी पुरी यांनी दिली आहे.

सौजन्य – (जिमाका)

Related posts

लग्नात पाळी आलेली सांगितली नाही म्हणून नववधूला घटस्फोट

nirbhid swarajya

नगरसेवक सतिषआप्पा दुडे यांच्याकडून सफाई कर्मचार्‍यांना किराणा साहित्य वाटप

nirbhid swarajya

मुख्याधिकारी आकोटकर साहेब तुम्ही खरंच नगरपरिषदेचे मुख्याधिकारी आहात का ?

nirbhid swarajya
error: Content is protected !!