September 8, 2026
आरोग्य जिल्हा

जिल्हयात आज प्राप्त ५७ कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’

बुलडाणा : जिल्ह्यात गत दोन दिवसानंतर आज दिलासादायक वृत्त आले आहे. प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेले तब्बल ५७ अहवाल आज प्राप्त झाले असून सर्व अहवाल निगेटिव्ह आहेत. आतापर्यंत ७४२ रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. जिल्ह्यात एकूण २९ रुग्ण कोरोनाबाधित रूग्ण आहेत. त्यापैकी एक मृत आहे.  आतापर्यंत २३ कोरोनाबाधीत रुग्णांचा तपासणी अहवाल कोरोना निगेटिव्ह आल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे कोविड रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुटी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या २३ आहे.  सध्या रूग्णालयात पाच रूग्ण कोरोनाबाधीत असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे.   तसेच आज १८ मे रोजी ५७ अहवाल प्राप्त झाले आहेत. हे सर्व ५७ अहवाल निगेटीव्ह आहेत. तसेच आज रोजी अहवालाच्या प्रतिक्षेत असलेले नमुने ८३ आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल ७४२ आहेत, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. आर. जी पुरी यांनी दिली आहे.

Related posts

खामगांवातील बर्डे प्लॉट भागात पकडला सव्वा लाखाचा गुटखा

nirbhid swarajya

शेगाव येथे 16 जुलै 2023 रोजी जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज यांचा दर्शन सोहळा…

nirbhid swarajya

कोरोना योद्धांकरीता अभिनव उपक्रम

nirbhid swarajya
error: Content is protected !!