September 4, 2026
आरोग्य जिल्हा

जिल्हयात आज प्राप्त ४ कोरोना अहवाल निगेटिव्ह ; एक पॉझिटिव्ह

बुलडाणा : जिल्ह्यात आज प्राप्त ०५ रिपोर्ट पैकी ०४ रिपोर्ट निगेटिव्ह असून एक रिपोर्ट पॉझिटिव आला आहे.  आतापर्यंत ६२५ रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत २५ रुग्ण कोरोनाबाधित सापडले आहेत.  त्यापैकी एक मृत आहे.  तसेच आतापर्यंत २३ कोरोनाबाधीत रुग्णांचा तपासणी अहवाल कोरोना निगेटिव्ह आल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे कोविड रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुटी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या २३ आहे.  सध्या रूग्णालयात एक रूग्ण उपचार घेत आहे. आज पॉझिटिव्ह आलेला पुरुष हा ४५ वर्षीय असून जळगाव जामोद येथील रहिवासी आहे. त्यामुळे प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाय योजना म्हणून रुग्णाच्या घराजवळील परिसर प्रतिबंधित क्षेत्र घोषित केले आहे. सदर क्षेत्र पूर्णपणे सिल करण्यात आले आहे.
   तसेच आज ११ मे रोजी ०५ अहवाल प्राप्त झाले आहेत. यामध्ये एक पॉझिटिव्ह व चार अहवाल निगेटिव आहेत. तसेच आज रोजी अहवालाच्या प्रतिक्षेत असलेले नमुने २४ आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल ६२५ आहेत व पॉझिटिव्ह अहवाल २५ आहेत, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. आर. जी पुरी यांनी दिली आहे.

सौजन्य : जिमाका

Related posts

जिल्ह्यात आज प्राप्त 208 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर 48 पॉझिटिव्ह

nirbhid swarajya

अबब..एका गावात निघाले १३२ साप

nirbhid swarajya

खामगांव पोलिसांच्या वतीने महिला दिन साजरा

nirbhid swarajya
error: Content is protected !!