September 4, 2026
आरोग्य जिल्हा

जिल्हयात आज प्राप्त २१ रिपोर्ट ‘निगेटीव्ह’

बुलडाणा : जिल्ह्यात आज ३० एप्रिल रोजी २१ रिपोर्ट प्राप्त झाले. हे सर्व २१ रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत. जिल्ह्यात एकूण २४ रूग्ण कोरोना पॉझीटीव्ह आढळलेले असून त्यापैकी एक मृत आहे. त्यापैकी १७ रूग्णांचे कोरोनासाठी दुसऱ्यांदा अहवाल निगेटीव्ह आल्यामुळे वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे त्यांना रूग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुटी देण्यात आलेल्या रूग्णांची संख्या १७ आहे, तर सध्या रूग्णालयात ६ रूग्ण उपचार घेत आहेत.   तसेच आज रोजी अहवालाच्या प्रतिक्षेत असलेले नमुने ७६ आहेत. कोविड रूग्णालयात उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रूग्ण ६ आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल ४०३ प्राप्त झाले आहेत, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. आर. जी पुरी यांनी दिली आहे

Related posts

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे काळ्या फिती लावून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

nirbhid swarajya

सामान्य ज्ञान परीक्षेमध्ये जिजाऊ स्कूल ऑफ स्कॉलर्स च्या विद्यार्थ्यांचे सुयश…

nirbhid swarajya

दुकाने उघडण्याचे परवानगीसाठी नाभिक समाजाचे निवेदन

nirbhid swarajya
error: Content is protected !!