September 4, 2026
आरोग्य जिल्हा

जिल्हयात आज प्राप्त ६ कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’

बुलडाणा : जिल्ह्यात आज प्राप्त ०६ रिपोर्ट निगेटिव्ह असून आतापर्यंत ५०२ रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत २४ रुग्ण कोरोनाबधित होते. त्यापैकी एक मृत आहे.  तसेच आतापर्यंत १९ कोरोनाबधीत रुग्णांचा दुसरा अहवाल कोरोना निगेटिव्ह आल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे कोविड रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुटी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या १९ असून सध्या रूग्णालयात ४ रूग्ण उपचार घेत आहेत.   तसेच आज ३ मे रोजी ०६ अहवाल प्राप्त झाले आहेत. हे सर्व ०६ अहवाल निगेटीव्ह आहेत. तसेच आज रोजी अहवालाच्या प्रतिक्षेत असलेले नमुने ७५ आहेत. कोविड रूग्णालयात उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रूग्ण ४ आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल ५०२ आहेत, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. आर. जी पुरी यांनी दिली आहे.

सौजन्य – जिमाका

Related posts

शेतकर्‍यांची फसवणूक होऊ नये यासाठी खतांच्या किमती जाहीर करा – जि.प.कृषी अधिकारी

nirbhid swarajya

जिजाऊ जन्मोत्सव सोहळा अभूतपूर्व ठरण्याची चिन्हे! जिजाऊ श्रुष्टी नटली; जन्मस्थान सजले !!

nirbhid swarajya

ज्‍येष्ठ गाैरींच्‍या देखाव्‍यातून डॉक्‍टरांबद्दल व्‍यक्‍त केली कृतज्ञता

nirbhid swarajya
error: Content is protected !!