September 4, 2026
खामगाव

जनुना तलावात 23 वर्षीय युवकाचा बुडून मृत्यू

खामगांव : येथील जनुना तलावात बर्डे प्लॉट मधील 23 वर्षीय युवक तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना आज सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास उघडकीस आली. खामगाव बर्डे प्लॉट येथील युवक अर्जुन निगास नाटेकर युवक जनुना तलावात याचा बुडून मृत्यू झाल्याची घटना आज सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली.

घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलिस स्टेशनचे एपीआय धीरज बांडे, नापोका लोणीकर, पोका रविंद्र कन्नर, पोका त्रिशूल ठाकरे हे घटनास्थळी दाखल झाले होते. मृतकाला बाहेर काढून घटनेचा पंचनामा करून शवविच्छेदनात पाठवण्यात आले होते. या घटनेने संपुर्ण बर्डे प्लॉट परिसरात शोककळा पसरली आहे.पुढील तपास शिवाजी नगर पोलीस करत आहेत.

Related posts

वंचित बहुजन आघाडी च्या वतीने उपविभागीय कार्यालयासमोर किसान बाग आंदोलन

nirbhid swarajya

चारचाकी वाहनाची दुचाकीला धडक; एकाचा मृत्यू

nirbhid swarajya

भाजप स्थापना दिन उत्साहात साजरा

nirbhid swarajya
error: Content is protected !!