April 19, 2026
आरोग्य खामगाव गुन्हेगारी जिल्हा बुलडाणा

चारचाकी वाहनाचा अपघात ३ जखमी ; १ मृत्यु

खामगाव : येथून जवळ असलेल्या जयपुर लांडे फाट्या जवळ चारचाकी गाडीचा अपघात होऊन ३ जण जखमी झाले असून एकाचा मृत्यु झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार येथील येथून जवळच असलेल्या जयपुर लांडे फाट्याजवळ चार चाकी वाहनाचे संतुलन सोडून गाडी लिंबाच्या झाडाला धडकून अपघात झाला. ही घटना सायंकाळी ६:३० च्या सुमारास घडली आहे. नांदुरा येथे एचडीएफसी बँकेमध्ये मॅनेजर पदावर असलेले संदीप विठ्ठलराव काळे वय ३६ रा.वाशिम हे आपल्या सहकार्‍यांसोबत आपल्या चारचाकी गाडी क्र.एमएच-३७-व्ही-१८२२ याने शेगाव येथे दर्शनासाठी जात असताना जयपुर लांडे फाट्याजवळ गाडीचे संतुलन सुटून गाडी निबाच्या झाडाला जाऊन जोरदार धडकली. या अपघातात संदीप काळे वय ३६ रा. वाशिम, शिवाजी क्षीरसागर वय २७, प्रविण धामोडकर वय २६ हे तिघे जखमी झाले असून विठ्ठल म्हेसरे याचा जागीच मृत्यु झाला आहे. गाडीची धडक इतकी जोरदार होती कि, गाडी रस्त्याच्या कडेला जाऊन पलटया घेऊन गाडीचा अक्षरशः चुराडा झाला आहे. यावेळी घटनास्थळावर उपस्थित असलेले नागरिकांनी तात्काळ जखमींना येथील सामान्य रुग्णालयात भरती केले आहे.

Related posts

खामगांव मधे वाढत आहे मृत्युचे प्रमाण; आज ९ जणांचा मृत्यु

nirbhid swarajya

ओबीसी विरोधी राज्य सरकार बरखास्त करा – सागर फुंडकर

nirbhid swarajya

चौधरी वाईन शॉपमधून गैर कायदेशीर दारू विक्री राज्य उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांचा छापा

nirbhid swarajya
error: Content is protected !!