September 4, 2026
खामगाव जिल्हा बातम्या बुलडाणा महाराष्ट्र राजकीय विदर्भ शेगांव

ग्रामपंचायत उपसरपंचांची निवडणूक ६ जानेवारीला…

खामगाव: जिल्ह्यातील २७९ ग्रामपंचायतींच्या ३० डिसेंबर रोजी लागलेल्या निकालानंतर आता ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदासाठी निवडणूक होत आहे.यासाठी ६ जानेवारी ही तारीख निश्चित करण्यात आलेली आहे.ग्रामपंचायतीची प्रथम सभा ६ जानेवारी रोजी होणार असून त्यामध्ये उपसरपंचाची निवड केली जाईल.डिसेंबर महिन्यात झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये सरपंचाची थेट जनतेमधून निवड करण्यात आली होती.त्यात भाजप व शिवसेनेच्या शिंदे गटाने सर्वाधिक ४३ टक्के जागा पटकावल्या होत्या तर महाविकास आघाडीने २४ टक्के आणि अपक्षांनी ३३ टक्के जागा मिळविल्या होत्या. दरम्यान ७ सरपंचाची पदे उमेदवारी अर्ज न आल्याने रिक्त राहिलेली आहेत.या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये जिल्ह्यातील राजकारण चांगलेच तापले होते.

आता उपसरपंचाच्या निवडणुकीमुळेही ग्रामीण भागातील राजकारण तापण्यास प्रारंभ झाला आहे. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीनंतरची पहिली सभा घेण्याबाबत जिल्हाधिकारी डॉ. एच. पी. तुम्मोड यांनी तहसीलदारांना २८ डिसेंबर रोजी निर्देश दिले आहेत. निवडून आलेले सदस्य सध्या उपसरपंचपदासाठी फिल्डींग लावण्यात व्यस्थ झाल्याचे एकंदरीत चित्र दिसत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील राजकारण पुन्हा एकदा चांगलेच तापले आहे.

Related posts

खामंगाव येथे जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज यांचा पादुका दर्शन व प्रवचन सोहळ्याचे आयोजन

nirbhid swarajya

मोताळा तहसीलदारांच्या शासकीय निवासस्थानात कोतवालाची आत्महत्या

nirbhid swarajya

बोरजवळा ग्रामसेवा सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी मधुकर तोमर

nirbhid swarajya
error: Content is protected !!