July 21, 2026
आरोग्य जिल्हा

आज प्राप्त 9 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर 3 पॉझीटीव्ह

बुलडाणा : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या अहवालांपैकी 12 अहवाल आज प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये 9 अहवाल कोरोना निगेटीव्ह, तर 3 अहवाल कोरोना पॉझीटीव्ह आहेत. पॉझीटीव्ह रूग्णांमध्ये चांदुर बिस्वा ता. नांदुरा येथील आधीच्या कोरोनाबाधीत युवकाच्या निकट संपर्कातील  16 व 12 वर्षीय युवती आहेत. तसेच चिखली येथील 24 वर्षीय महिलेचा समावेश आहे. सदर महिलेचा मुंबई प्रवास इतिहास आहे. आतापर्यंत 880 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. जिल्ह्यात एकूण 48 कोरोनाबाधित रूग्ण आहेत. त्यापैकी तीन मृत आहे.  आज शेगांव येथील 35 वर्षीय एका कोरोनाबाधीत रूग्णाला वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.  आतापर्यंत 27 कोरोनाबधीत रुग्णांचा तपासणी अहवाल कोरोना निगेटिव्ह आल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुटी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 27 आहे.  सध्या रूग्णालयात 18 कोरोनाबाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत.   तसेच आज 26 मे रोजी 12 अहवाल प्राप्त झाले आहेत. तसेच आज रोजी अहवालाच्या प्रतिक्षेत असलेले नमुने59 आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 880 आहेत, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. आर. जी पुरी यांनी दिली आहे.

Related posts

पोलिसांची वरली मटका वर धाड

nirbhid swarajya

प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची पत्रकार देशमुख यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेट !

nirbhid swarajya

स्व. सुभाषराव देशपांडे यांचे प्रेरणेतून शहराचा विकास सुरूच ठेवणार:आ.अँड.आकाश फुंडकर

nirbhid swarajya
error: Content is protected !!