September 5, 2026
आरोग्य जिल्हा

आज प्राप्त 38 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर 3 पॉझीटीव्ह

बुलडाणा :  प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या अहवालांपैकी 41 अहवाल आज प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये 38 अहवाल कोरोना निगेटीव्ह, तर 3 अहवाल कोरोना पॉझीटीव्ह आहेत. पॉझीटीव्ह रूग्णांमध्ये रायगड कॉलनी, बुलडाणा येथील 24 वर्षीय तरूण, सावरगांव जहाँ ता. मोताळा येथील 35 वर्षीय पुरूष आणि येरळी ता. नांदुरा येथील 39 वर्षीय पुरूष आहे. सावरगांव जहाँ ता. मोताळा येथील तरूणाचा मुंबई प्रवास इतिहास आहे. तसेच येरळी ता. नांदुरा येथील पुरूषही मुंबई येथून आलेला आहे. मात्र सदर व्यक्तीला नांदुरा येथील आयटीआय येथे क्वारंटाईन करण्यात आले होते. त्याचप्रमाणे बुलडाणा येथील युवक हा फिलीपाईन्स येथून आलेला आहे. तसेच आव्हा ता. नांदुरा येथील एका 24 वर्षीय रूग्णाला आज कोविडचे मागील दहा दिवसांपासून कुठलेही लक्षणे नसल्यामुळे  रूग्णालयातून सुट्टी देण्यात आली.  आतापर्यंत 1053 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. जिल्ह्यात एकूण 53 कोरोनाबाधित रूग्ण आहेत. त्यापैकी तीन मृत आहे.  आतापर्यंत 29 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुटी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 29 आहे.  सध्या रूग्णालयात 21 कोरोनाबाधीत रूग्णांवर उपचार  सुरू आहेत.   तसेच आज 28 मे रोजी 41 अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये 38 निगेटीव्ह, तर 3 पॉझीटीव्ह आहेत. तसेच आज रोजी अहवालाच्या प्रतिक्षेत असलेले नमुने 91 आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 1053 आहेत, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. आर. जी पुरी यांनी दिली आहे.

ReplyForward

Related posts

बंद केलेल्या तेरा घंटागाड्या त्वरित सुरू करुन खामगांवकरांच्या आरोग्याशी खेळणार्यां घनकचरा व्यवस्थापन कंत्राटदाराला काळ्या यादीत टाका अन्यथा आंदोलन…

nirbhid swarajya

सायबर क्राइम प्रकरण रफा दफा करण्यासाठी पैशाची मागणी ?

nirbhid swarajya

SSDV शाळेकडून फी भरण्यासाठी पालकांना नाहक त्रास….

nirbhid swarajya
error: Content is protected !!