September 5, 2026
आरोग्य जिल्हा

आज प्राप्त 35 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर 2 पॉझीटीव्ह

शेगांव येथील एका रूग्णाला सुट्टी

बुलडाणा : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या अहवालांपैकी 37 अहवाल आज प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये 35 अहवाल कोरोना निगेटीव्ह, तर 2 अहवाल कोरोना पॉझीटीव्ह आहेत. पॉझीटीव्ह रूग्णांमध्ये निमखेड ता. दे.राजा येथील 22 वर्षीय तरूण आणि मलकापूर येथील 38 वर्षीय पुरूष आहे. निमखेड ता. दे.राजा येथील तरूणाचा मुंबई प्रवास इतिहास आहे. तसेच शेगांव येथील एका महिला रूग्णाला आज कोविडचे मागील दहा दिवसांपासून कुठलेही लक्षणे नसल्यामुळे रूग्णालयातून सुट्टी देण्यात आली. आतापर्यंत 1015 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. जिल्ह्यात एकूण 50 कोरोनाबाधित रूग्ण आहेत. त्यापैकी तीन मृत आहे. आज शेगांव येथील 30 वर्षीय एका कोरोनाबाधीत रूग्णाला वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. आतापर्यंत 28 कोरोनाबाधीत रुग्णांचा तपासणी अहवाल कोरोना निगेटिव्ह आल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुटी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 28 आहे. सध्या रूग्णालयात 19 कोरोनाबाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत.
तसेच आज 27 मे रोजी 37 अहवाल प्राप्त झाले आहेत. तसेच आज रोजी अहवालाच्या प्रतिक्षेत असलेले नमुने 64 आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 1015 आहेत, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. आर. जी पुरी यांनी दिली आहे.

सौजन्य : (जिमाका)

Related posts

एका दिवसात आठ हजार भाविकांनी घेतले श्रींचे दर्शन

nirbhid swarajya

जिल्ह्यात आज प्राप्त 120 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर 12 पॉझिटिव्ह

nirbhid swarajya

भेंडवळ घटमांडणी ला कोणताही शास्त्रीय आधार नाही- रघुनाथ कौलकार

nirbhid swarajya
error: Content is protected !!