September 4, 2026
आरोग्य जिल्हा

आज प्राप्त ३२ कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर एक पॉझीटीव्ह

बुलडाणा : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या अहवालांपैकी आज ३३ अहवाल प्राप्त झाले आहेत.त्यापैकी ३२ अहवाल निगेटीव्ह व एक अहवाल पॉझीटीव्ह आला आहे. पॉझीटीव्ह अहवाल हा टुनकी, ता. संग्रामपूर येथील १७ वर्षीय युवकाचा आहे. मुंबई येथून परत आला असल्याचा प्रवास इतिहास आहे. आतापर्यंत ९०६ रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. जिल्ह्यात एकूण ३७ कोरोनाबाधित रूग्ण आहेत. त्यापैकी तीन मृत आहे. नरवेल ता. मलकापूर येथील पाच वर्षीय चिमुकलीला आज सुट्टी देण्यात आली. त्यामुळे आतापर्यंत २६ कोरोनाबधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे कोविड रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुटी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या २६ आहे. सध्या रूग्णालयात ०८ कोरोनाबाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत.

तसेच आज २४ मे रोजी ३३ अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये ३२ निगेटीव्ह, तर एक पॉझीटीव्ह आहेत. तसेच आज रोजी अहवालाच्या प्रतिक्षेत असलेले नमुने १०५ आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल ९०६ आहेत, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. आर. जी पुरी यांनी दिली आहे.

Related posts

जिजाऊ बिग्रेडच्या महासचिव यांच्या घरावर झालेल्या भ्याड हल्ल्या करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा ; जिजाऊ ब्रिगेडची मागणी

nirbhid swarajya

भारतीय जैन संघटना स्वीकारणार कोविड ग्रस्त अनाथ विद्यार्थ्यांचे पालकत्व

nirbhid swarajya

राष्ट्रवादी काँग्रेसची पार्टीच्या वतीने स्वाभिमान सप्ताह निमित्त नियोजन बैठक संपन्न

nirbhid swarajya
error: Content is protected !!