June 5, 2026
आरोग्य जिल्हा बुलडाणा

आज जिल्ह्यात प्राप्त 236 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर 44 पॉझिटिव्ह

12 रूग्णांची कोरोनावर मात


बुलडाणा : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 280 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 236 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 44 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 16 व रॅपिड टेस्टमधील 28 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 3 तर रॅपिड टेस्टमधील 233 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 236 अहवाल निगेटीव्ह आहेत.
पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : खामगांव : 54 व 55 वर्षीय पुरुष, भुसारी गल्ली – 53 वर्षीय पुरूष, महबुब गल्ली : 55 वर्षीय महिला, शंकर नगर : 25 वर्षीय महिला, केशव प्लॉट 40 वर्षीय पुरुष, शिवाजी नगर 38 वर्षीय महिला, 30 वर्षीय पुरुष, सिविल लाइन्स 20 व 45 वर्षीय महिला, अग्रसेन चौक 72 वर्षीय पुरुष, यशोदरा नगर 22 वर्षीय पुरुष, भालेगाव 60 वर्षीय पुरुष. दे. राजा : जुना जालना रोड – 23, 51, 20 व 17 वर्षीय महिला, सिव्हील कॉलनी : 17 19 वर्षीय महिला, अग्रसेन चौक : 65 वर्षीय महिला, बालाजी नगर : 56 व 26 वर्षीय महिला दुर्गापुरा 22 वर्षीय महिला, आदर्श कॉलेनी 28 वर्षीय पुरुष, जळगांव जामोद : 50 वर्षीय महिला, शेगांव : दसरा नगर 38 वर्षीय पुरूष, 19 वर्षीय पुरुष, देशमुख पुरा 28 वर्षीय पुरुष, धनगर फैल 12 वर्षीय पुरुष, बुलडाणा : मुठ्ठे ले आऊट 32 वर्षीय पुरूष, नांदुरा : 48 वर्षीय महिला, माळीपुरा 34 वर्षीय पुरुष, वडगाव माळी ता. मेहकर : 45, 40, 75 वर्षीय महिला, 16, 5 व 48 वर्षीय पुरुष, मलकापूर : 42 व 38 वर्षीय पुरुष, संत ज्ञानेश्वर नगर 73 वर्षीय महिला, 11 व 16 वर्षीय पुरुष आणि मूळ पत्ता शिपोरा ता भोकरदन जि. जालना येथील 60 वर्षीय महिला संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 44 रूग्ण आढळले आहे. यामध्ये आज उपचारादरम्यान खामगाव येथील 50 व 55 वर्षीय महिला रूग्णाचा मृत्यू झाला आहे.
तसेच आज 12 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामध्ये साखर खर्डा तालुका सिंदखेड राजा येथील 65 वर्षीय पुरूष, 33 वर्षीय महिला, सिविल कॉलनी ता. दे. राजा येथील 30 वर्षीय पुरुष, 28 वर्षीय महिला, दूर्गापुरा दे. राजा येथील 78, 50, 12 वर्षीय पुरुष, 48 व 13 वर्षीय महिला, जलालपुरा खामगांव येथील 52 वर्षीय पुरुष, सती फैल येथील 85 वर्षीय महिला व डी एस डी बुलडाणा येथील 37 वर्षीय महिला रूग्णाचा समावेश आहे. तसेच आजपर्यंत 5575 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 297 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 297 आहे.
आज रोजी 41 नमुने अहवालाच्या प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 5575 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 669 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 297 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात 352 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 20 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

Related posts

विवेकानंद आश्रमात गुरूपूजन… आरोग्य संदेश देत मास्क सॅनिटाझयरचे घरपोच वितरण…

nirbhid swarajya

१५ डिसेंबर ला हिवाळी अधिवेशनामध्ये विधानसभावर पोलिस पाटलांचा महामोर्चा धडकणार …

nirbhid swarajya

‘त्या’ बालाचा छळ असह्य झाला… २३ वर्षीय युवकाने गळफास घेऊन जीव दिला….

nirbhid swarajya
error: Content is protected !!