February 11, 2025
अमरावती खामगाव जिल्हा नागपुर पुणे बातम्या बुलडाणा महाराष्ट्र मुंबई राजकीय विदर्भ

वंचित कडून सतीश पवार विरुद्ध पोलिसात तक्रार…

पक्षावर सेटलमेंटचे केले होते आरोप

बुलढाणा:वंचित च्या युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष सतीश पवार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी फेसबुक वर लाईव्ह करीत वंचित मधील वरिष्ठ पातळीवरील पदाधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले होते. ॲड.बाळासाहेब आंबेडकर यांना काही वरीष्ठ पदाधिकारी हे भेटून दिशाभूल करतात, तसेच उमेदवारीसाठी वरिष्ठ पातळीवर सेटलमेंट केल्या जाते, असे नमूद केले होते. या आरोपावरून आता वंचित बहुजन आघाडीने पवार विरुद्ध थेट पोलिसात तक्रार नोंदवली आहे.वंचितचे घाटाखाली बुलढाणा जिल्हाअध्यक्ष देवा हिरवाडे यांनी बुधवारी बुलढाणा शहर पोलिसात तक्रार नोंदवली या तक्रारीमध्ये नमूद केले कि, वंचित बहुजन युवा आघाडीचे बुलढाणा माजी जिल्हाध्यक्ष सतीश पवार यांनी आपला जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याची माहिती फेसबुक लाईव्या च्या माध्यमातून देताना पक्षावर उमेदवारी साठी सेटिंग करण्यात येत असल्याचा आरोप केला आहे.

तसेच पक्षातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांवर अनेक गंभीर स्वरूपाचे आरोप देखील केले आहेत. वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून प्रकाश आंबेडकर यांच्यापर्यंत चुकीची माहिती पोहोचवली जात आहे, सेटलमेंट करून पदाधिकाऱ्यांना डावललं जात आहे, त्यांना लाचार केल जात आहे, ज्या उमेदवाराची केवळ आणि केवळ पराभवाची पार्श्वभूमी आहे त्यांना दलाली करून उमेदवारी दिली जात आहे, यासह अनेक गंभीर आरोप सतीश पवार यांनी केले आहेत. पक्ष सेटलमेंट करतो आणि उमेदवारी देतो असा थेट आरोप केला असल्याने पक्षाची बदनामी झाली आहे.असे नमूद केले आहे. वंचित चे प्रदेश उपाध्यक्ष तथा प्रवक्ता धैर्यवर्धन पुंडकर यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप करण्यात आले होते.

पवार यांना या आधीच कारणे दाखवा नोटीस

वंचित बहुजन युवा आघाडीचे बुलढाणा माजी जिल्हाध्यक्ष सतीश पवार केलेल्या आरोपाबाबत कुठलेही पुरावे दिले नाहीत. पक्षा विरुद्ध आणि उमेदवारी मिळविण्यासाठी करीत असलेल्या कृतीमुळे आणि पक्ष नेतृत्वा कडून दिलेल्या उमेदवाराला सहकार्य केले नसल्याने वंचित बहुजन युवा आघाडीचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष डॉ निलेश विश्वकर्मा ह्यांनी शनिवार दिनांक ४ मे रोजी पवार कारणे दाखवा नोटीस बजावली होती. तसेच खुलासा मागून हकालपट्टी का करण्यात येऊ नये अशी विचारणा केली होती.मात्र त्यांनतर पवार यांनी थेट राजीनामा देत पक्षावर गंभीर आरोप केले होते.

Related posts

कोविड चाचणी केंद्रावरच सोशल डिस्टंसिंग चा फज्जा

nirbhid swarajya

खामगांवचे आमदार कोरोना पॉजिटिव्ह ; स्वतः सोशल मीडिया वरून दिली माहिती

nirbhid swarajya

जिल्ह्यातील ९७ अधिकारी उद्या सामूहिक रजेवर

nirbhid swarajya
error: Content is protected !!