अभ्यासात कमकुवत विद्यार्थ्यांनाही हुशार बनविण्यासाठी शिक्षक कटिबद्धच:- प्रा गुंजकर……
खामगाव:-गेल्या चार वर्षांपासून आवार येथे ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांसाठी नर्सरी ते वरिष्ठ महाविद्यालया पर्यन्त भव्य शैक्षणिक दालन प्रा गुंजकर सरांनी उपलब्ध करून दिले आहे.अगदी पहिल्याच वर्षांपासून नर्सरी ते दहावी पर्यन्त चालू होणारी व सर्वच वर्गात पुरेशी विद्यार्थी संख्या असणारी प्रा गुंजकर सरांची जिजाऊ स्कूल ऑफ स्कॉलर्स,ही जिल्ह्यातील पहिली शाळा असावी.गेल्या चार वर्षांपासून नर्सरी ते दहावी पर्यन्त च्या वर्गात खामगावसह जवळपास वीस गावातील विद्यार्थ्यांची येणारी संख्या ही दिवसेंदिवस वाढत आहेच. त्याला कारणही तसंच पालकांचा शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेवर वाढत जाणारा विश्वास. हाच विश्वास कायम राहावा म्हणून जे नर्सरी ते 4 थी पर्यन्त विद्यार्थी अभ्यासात कमकुवत आहेत, अशा विद्यार्थ्यांच्या पालकांची सभा आज शनिवार दिनांक 11 डिसेंबर ला सकाळी 10:40 वाजता स्वतः प्रा गुंजकर सरांच्या उपस्थिती मध्ये शाळेत पार पडली.पालकांचीही भरपूर प्रमाणात याठिकाणी उपस्थिती होती.आपला पाल्य शाळेतून घरी आल्यावर नेमकं काय करतो, दिलेला अभ्यास पूर्ण करतो का? तो मोबाईलवर तर त्याचा अभ्यासाचा वेळ नाही घालवत आहे? त्याचे नोटबुक संबंधित वर्गशिक्षक वेळोवेळी चेक करतात का? अभ्यासात नेमका तो कशात मागे आहे.व का आहे?असे प्रश्न नेहमी पालकांना पडायला हवेत व त्यांनी त्याविषयी संबंधित वर्गशिक्षक व विषय शिक्षकांना भेटून आपल्या पाल्याच्या अडचणी वेळोवेळी सांगायला हव्यात, असे आव्हान प्रा गुंजकर सरांनी पालकांना बोलतांना केले.जे विद्यार्थी अभ्यासात कमकुवत आहेत. अशा विद्यार्थ्यांना थोडं वेगळ्या पद्धतीने कसं अध्यापन करून इतर हुशार विद्यार्थ्यांच्या बरोबरीने आणता येईल,व त्यासाठी पालकांचा काय रोल असेल याविषयी सुद्धा चर्चा करण्यात आली.”आपला पाल्य हीच आपल्या आयुष्याची खरी संपत्ती” व ही संपत्ती वाढवायची असेल तर त्याला अगदी नर्सरी पासूनच त्याच्या शैक्षणिक गुणवत्तेची काळजी घेण्यासाठी आपण पालक म्हणून कटीबद्ध असणे ही काळाची गरज आहे असेही सरांनी बोलतांना सांगितले.यावेळी संस्थेच्या सचिव प्रा सौ सुरेखाताई रा गुंजकर मॅडम,मुख्याध्यापिका प्रा सौ अपर्णाताई बनकर मॅडम,व नर्सरी ते 4 थी पर्यन्तच्या पालकांची उपस्थिती होती.