April 18, 2026
खामगाव गुन्हेगारी जिल्हा बुलडाणा

मँट्याडोर व दुचाकीच्या धड़केत १ ठार; १ जण जखमी

खामगांव : खामगांव चिखली मार्गावरील गारडगांव फाट्याजवळ ४०७ मॅट्याडोर धडकेत दुचाकीस्वार जागिच ठार झाल्याची घटना घडली आहे याप्रकरणी ग्रामीण पोलिस स्टेशन मधे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ग्रामीण पोलिस स्टेशन अतंर्गत येणाऱ्या खामगांव चिखली मार्गावरील गारडगांव फाट्याजवळ काल दुपारी ४ वाजताच्या सुमारास धम्मपाल जनार्धन सावंग वय ४० वर्ष मुगला तुषार दोघे रा. रोहणा दुचाकी क्र एम एच २८ के ३४८४ गारडगांव येथून खामगांव कड़े येत असताना समोरून येणाऱ्या आरोपी ४०७ मँट्याडोर क्र एम एच ४८ जी ०१०० चा चालकाने त्याचे ताब्यातील वाहन निष्काळजीपणे व भरधाव वेगाने चालवून दुचाकीला धडक दिली, या धडकेत दुचाकीस्वाराचा जागिच मृत्यु झाला असून व दुचाकीवर पाठीमागे बसलेला मृतक यांचा मूलगा तुषार हा जखमी झाला आहे. सोबतच दुचाकी चे नुकसान सुद्धा केले आहे. याप्रकरणी मृतकाचे भाऊ यशवंत जनार्धन सावंग वय ३१ वर्ष रा. रोहणा यांनी ग्रामीण पोलिस स्टेशन ला दिलेल्या फिर्यादि वरुन ट्रक मँट्याडोर चालका विरूध्द भादवी कलम २७९,३०४ (अ), ३३७,४२७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास पोहेका सुनील राऊत करीत आहे.

Related posts

आणि तिचा वाढदिवशीच कोरोनाने घेतला बळी…

nirbhid swarajya

शेगाव तालुक्यात रेती माफीयांचा सळसुळाट…पुर्णा नदीपात्रातून होत आहे अवैध रेतीची वाहतूक…

nirbhid swarajya

खामगांव कडकडित बंद

nirbhid swarajya
error: Content is protected !!