June 5, 2026
आरोग्य खामगाव बुलडाणा राजकीय

जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन; गुन्हा दाखल

खामगांव : अयोध्या येथे काल 5 ऑगस्ट रोजी श्रीराम मंदिराचे भूमिपूजन असल्याने कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कलम 37 (1 व 3) जारी केले होते. त्यामुळे काल सकाळी 6 ते रात्री 9 पर्यंत अनेक बंधने जिल्हा प्रशासनाने लावली होती. या बंधन व नियमांचे उल्लंघन करणार्‍याविरुद्ध कठोर कारवाई केली जाणार असल्याचेही प्रशासना कडून सांगितले होते.याचेच उल्लंघन करत खामगांव येथील गांधी चौकात फटाके व आतिशबाजी करण्यात आली.
कलम 37 (1) व (3) लागू केल्यामुळे जिल्ह्यात लोकांना सार्वजनिक ठिकाणी, रस्त्यावर, चौकात एकत्र येता येणार नाही. कुठेही सार्वजनिक ठिकाणी, चौकात प्रतिमा पूजन, आरती, घोषणा देणे व फटाके फोडता येणार नाही ऐसे सुद्धा प्रशासनाने सांगितले होते.मात्र याचेच उल्लंघन करत काल गांधी चौकात फटाके फोडण्यात आले व श्रीरामाच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले.तसेच श्रीराम यांची ऊंच प्रतिमा लावून व श्रीराम यांचे डिजिटल प्रिंट असलेले चौकोनी बॉक्स तयार करून गांधी चौक येथे उभे करून व त्याच्या आजूबाजूला कुंडया ठेवून रस्ता अडवून रहदारीस अडथळा निर्माण केला. कोरोना विषाणुच्या पार्श्वभूमिवर मास्क न लावणे, फिजिकल डिस्टनसिंग चे पालन न करणे, तसेच मोठ्या प्रमाणावर एकत्र येऊन बेकायदेशीर कृत्य करुन आदेशाचे उल्लंघन केले सदर आदेशात कोणत्याही प्रकारे सार्वजनिक कार्यक्रमास परवानगी देऊ नये व त्याची अंमलबजावणी करण्यासंदर्भात सूचित केल्या होत्या. जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्या प्रकरणी पोलिसांनी पो हे का गजानन वाघमारे यांच्या फ़िर्यादी वरून संजय उर्फ मुन्ना पुरवार व इतर पाच ते सहा आरोपीं विरुद्ध कलम 188, 269,341 135, 51 ब नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पी एस आय सराग हे करत आहेत.

Related posts

राज्यात रुग्णवाहिकांसाठी नवी नियमावली

nirbhid swarajya

मराठा सेवा मंडळ जिल्हाध्यक्ष पदी प्रभाकर लांजुडकर यांची निवड…

nirbhid swarajya

संतांची मांदियाळी : विनायक महाराज शांती आश्रम ला आले यात्रेचे स्वरुप

nirbhid swarajya
error: Content is protected !!